5,000 year old Tomb : उत्तर ब्रिटनमध्ये उत्खननात 5000 वर्षे जुनी रहस्यमयी कबर सापडली आहे. या कबरीजवळ सापडलेल्या वस्तु पाहून संशोधकही अचंबित झाले आहेत. या कबरीमध्ये स्त्री, पुरुष आणि लहान मुलांचे सांगाडे आढळले आहेत. या रहस्यमयी कबरीमुळे नवपाषाण युगातील अनेक रहस्य उलगडणार आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्कॉटलंडमधील ऑर्कनीमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना   5,000 वर्ष जुन्या थडग्याचे अवशेष सापडले आहेत. हे थडग म्हणजे  उत्तर ब्रिटनमधील निओलिथिक अभियांत्रिकीचे उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. या कबरीजवळ उत्खननादरम्यान 14 महिला, पुरुष आणि काही मुलांचे सांगाडे सापडले आहेत. कबरीजळील एका चेंबर सारख्या खोलीत हे सर्व सांगाडे आढळून आले आहेत. यापैकी दोन सांगाडे हे एकमेकांना मिठीत घेतलेल्या अवस्थेत सापडले आहेत. डॉ. ह्यूगो अँडरसन-व्हायमार्क, नॅशनल म्युझियम स्कॉटलंड येथील प्रागैतिहासिक (नियोलिथिक) चे वरिष्ठ क्युरेटर, कार्डिफ विद्यापीठातील निओलिथिक पुरातत्वाचे प्राध्यापक विकी कमिंग्स यांच्या पथकाने या कबरीचे संशोधन कले. 


अवाढव्य कबर


या कबरीचा व्यास 15 मीटरपेक्षा जास्त आहे. या कबरी सात-मीटर-लांब पायवाटेने प्रवेश करावा लागतो. हे थडगे पूर्णपणे दगडी बांधकामाचे आहे. या थडग्याचा आकार गोलाकार आहे. यामध्ये वक्र कमानी असलेल्या सहा आयताकृती भाग आहेत. ही कबर म्हणजे इंजिनीयरींगचा उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. या कबरीच्या आतमध्ये अतिशय रेखील कोरीव काम करण्यात आले आहे. याचे बांधकाम पाहून संशोधन अचंबित झाले आहेत. 


127 वर्षांपूर्वी नष्ट झाले होते काही अवशेष


127 वर्षांपूर्वी म्हणजेच 18व्या किंवा 19व्या शतकात या कबरीचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले होते. मात्र, आता नव्या संशोधनादरम्यान या कबरीतुन मनावी सांगाड्यांचे अवशेष सापडले आहेत. उत्सखननात या कबरीजवळ मानवी सांगाड्यांसह दगडी गदा, एक चेंडू  देखील सापडला आहे. 


प्राचीन चिमू संस्कृतीच्या काळात बळी दिलेल्या 227 मुलांचे शरीराचे अवशेष सापडले


प्राचीन चिमू संस्कृतीच्या काळात बळी दिलेल्या 227 मुलांचे शरीराचे अवशेष पेरू येथे पुरातत्व विभागाला सापडले होते. हुआंचाको येथे बळी दिलेल्या ठिकाणी गेल्यावर्षीपासून उत्खनन सुरू होते.  हुआंचाको लीमाच्या उत्तरेला एक पर्यटन शहर म्हणून प्रसिद्ध आहे. हुआंचाको येथे चिमू संस्कृतीच्या काळात बळी देण्याची प्रथा होती. या मुलांचे वय 4 ते 14 वर्षे यादरम्यानचे होते.