नवी दिल्ली : इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. चीनच्या वुहान शहरापासून सुरु झालेला प्रसार आज अनेक देशांमध्ये जावून पोहोचला आहे. ज्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे इटलीमध्ये पाहायला मिळतं आहे. चीन पेक्षा ही अधिक फटका इटलीला बसत आहे. जगभरातील देश मृतांचा वाढता आकडा पाहता चिंतेत आले आहेत. हा व्हायरस भारतात ही येवून ठेपला आहे. भारतात देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरस जगासाठी आज चिंतेचा विषय बनला आहे. चीनपासून हा व्हायरस संपूर्ण जगात पसरत आहे. पण कोरोनाचा सर्वाधिक कहर हा इटलीमध्ये पाहायला मिळतो आहे. इटलीमध्ये कोरोनाने शुक्रवारी तब्बल 627 लोकांचा जीव घेतला आहे. तर कोरोना झालेले नवीन 5986 रुग्ण समोर आले आहेत.


इटलीमध्ये आतापर्यंत एकूण 4032 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या 47,021 वर पोहोचली आहे.


इटलीमध्ये कोरोना व्हायरस खूप जलद गतीने पसरत आहे. इटलीमध्ये 2,655 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी येथील मृतांचा आकडा हा चीन पेक्षा हा अधिक होता.


इटली आणि चीनमध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. कोरोना हा वृद्ध व्यक्तींना लवकर होत असल्याचं आतापर्यंतच्या निरीक्षणातून पुढे आलं आहे.


कोरोना व्हायरसमुळे प्रतिकार क्षमता कमी होते. ज्यांना आधीपासूनच काही आजार आहेत. अशा लोकांना त्याची लवकर लागण होताना दिसत आहे. डायबिटीज, फुफ्फुसा संदर्भातील आजार असलेल्या लोकांना कोरोनाची लागण लवकर होत आहे.