मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 हटवल्यानंतर बंद करण्यात आलेली मोबाइल सेवा घाटीत सुरू करण्यात आली आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शनिवारी यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. 5 ऑगस्ट रोजी 370 काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर 68 दिवसांनी मोबाइल सेवा सुरू करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाटीत येणाऱ्या पर्यटकांवरील बंदी काढून टाकल्यानंतर एका दिवसाने पोस्टपेड मोबाइल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यटनाशी जोडलेल्या सर्व संघटनांनी प्रशासनाला विनंती केली. मोबाइल फोन घाटीत काम करत नसेल तर कोणताही पर्यटक येथे येणे पसंत करणार नाही. काही दिवसांपूर्वी घाटीत सर्व लँडलाइन फोन सेवा सुरू करण्यात आली. तर कुपवाडा आणि हंदवाडा येथे मोबाइल सेवा सुरू करण्यात आली. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्टपेड नंतर प्रीपेड मोबाइल सेवा देखील सुरू केली जाणार आहे. तसेच घाटीत इंटरनेट सेवा सुरू होण्याकरता स्थानिकांना काही काळ अजून वाट पाहावी लागणार आहे. घाटीत 66 लाख मोबाइल ग्राहक आहेत ज्यामध्ये जवळपास 40 लाख लोकांकडे पोस्टपेड मोबाइल सुविधा आहे. 


काही प्रमाणात लँडलाइन सेवा 17 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. तर चार सप्टेंबर रोजी जवळपास सर्व 50 हजार लँडलाइन सेवा सुरू झाली. मोबाइल इंटरनेट सेवा ऑगस्टच्या मध्यापासून सुरू झाली मात्र काही ठिकाणी दुरूपयोग झाल्यानंतर ही इंटरनेट सेवा 18 ऑगस्ट रोजी बंद करण्यात आली.