मुंबई : ज्या वयात मुलं खेळतात, बागडतात त्या वयात हा मुलगा 155 करोड रुपये कमावतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे 100 टक्के खरं आहे. आपण चर्चा करतोय 7 वर्षांच्या रेयानची. कुणाला लगेच विश्वास बसत नाही की 7 वर्षांचा रेयान एवढी कमाई कसं करू शकेल? महत्वाचं म्हणजे फोर्ब्सकडून ही लहान मुलांची यादी जाहीर झाली आहे.


रेयानची कमाई 155 करोड रुपये 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेयानचं Ryan Toys Review नावाचं यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरून रेयान एका वर्षात 22 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 155 करोड रुपये कमाई करत आहे. या यूट्यूब चॅनलचे सब्सक्राइबर्स 1.70 करोड रुपये असून पहिल्या वर्षातच त्या 10 मिलियन म्हणजे 1 करोड सब्सक्राइबर्स केले होते. 


12 महिन्यांच्या या कालावधीत त्याच्या सब्सक्राइबर्सची संख्या 70 लाखांनी वाढली. रेयान या चॅनलद्वारे खेळण्यांशी खेळतो आणि ते अनबॉक्स करून रिव्ह्यू देत असतो. रेयान हे सर्व काम कॅमेऱ्याच्या समोर करतो. 



जाहिरातीतून कमावतो एवढा पैसा 


रेयानने दिलेला रिव्ह्यू एक व्यक्ती शूट करत असतो आणि Youtube वर अपलोड करतो. त्याच्या चॅनलवर असे असंख्य व्हिडिओ आहेत जे मुलांना पाहायला आवडतात. Forbes नुसार, चॅनलच्या व्हिडिओवर येणारे व्ह्यूज आणि जाहिरातीतून त्याला पैसे मिळतात. 


पहिल्या वर्षी 2017 मध्ये फोर्ब्सकडून यूट्यूबच्या माध्यमातून कमावणाऱ्या 10 टॉप सेलिब्रिटीजची यादी जाहीर झाली. यामध्ये 6 वर्षीय रेयानचा 9 वा क्रमांक होता. त्यावेळी रेयान 11 बिलियन डॉलर म्हणजे 71 करोड रुपये कमाई करत असे. 


अशी केली सुरूवात 


रेयान 4 वर्षांचा होता तेव्हा त्याने जुलै 2015 मध्ये 'रायन टॉयज रिव्ह्यू' नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलं. या संपूर्ण कामात त्याच्या कुटुंबियांनी त्याला मदत केली. रेयान खेळण्यांबरोबरच लहान मुलांकरता फूड आयटमचा रिव्ह्यू देखील करतो.