दुबई: दुबईत झालेल्या भीषण बस अपघातामध्ये आठ भारतीय व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. स्थानिक यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील शेख मोहम्मद बिन झायेद महामार्गावर गुरुवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास हा अपघात घडला. या बसमधील अनेक प्रवाशी ईद साजरी करण्यासाठी ओमानमध्ये गेले होते. तेथून परतत असताना रशिदिया एक्झिटजवळच्या मेट्रो स्टेशनजवळ ही बस जोरात सिग्नलवर धडकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी बसमध्ये एकूण ३१ प्रवासी होती. यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये आठ भारतीयांचा समावेश आहे. तर उर्वरित जखमींवर रशिदिया रुग्णालयात उपचार सुरु होते. यापैकी चार भारतीयांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सर्व मृतांची ओळख पटली आहेत. राजगोपालन, फिरोज खान पठाण, रेशमा फिरोज खान पठाण, दीपक कुमार, जमालुद्दीन, किरण जॉनी, वासुदेव आणि तिलकराम ठाकूर अशी त्यांची नावे आहेत.



या घटनेनंतर दुबईतील भारतीय दुतावास सातत्याने अपघातग्रस्त बसमधील भारतीयांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे. त्यांना सर्वतोपरी मदत पुरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी ट्विटरवरून हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे. मदतीसाठी संजय कुमार (+971-504565441or +971-565463903) यांच्याशी संपर्क साधू शकता, अशी माहिती ट्विटमध्ये देण्यात आली आहे.