नवी दिल्ली : इस्रायलच्या विरोधी पक्षांनी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सत्तेवरून हद्दपार करण्यासाठी शेवटच्या क्षणी एकत्र येत देशातील एकता मजबूत करण्याचा निर्णय घेतला. इस्रायलमधील सर्व विरोधी पक्ष बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरोधात एकत्र येत आहेत आणि याकडे एक मोठा राजकीय बदल म्हणून पाहिले जात आहे.


8 मोठ्या राजकीय पक्षांची युती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येश अतीद पक्षाचे नेते याइर लापिद यांनी जाहीर केले की राजकीय वाटाघाटीद्वारे आठ पक्षांची युती तयार झाली आहे. नियमित रोटेशनच्या धोरणाखाली यामिना पक्षाचे नफ़्ताली बेनेट पहिले पंतप्रधान असतील आणि त्यांच्यानंतर लापिद देशाचे पंतप्रधान असतील.


रोटेशन पॉलिसीनुसार पंतप्रधान बदलले जातील


57 वर्षीय लापिद यांनी बुधवारी मध्यरात्री अंतिम मुदतीच्या अवघ्या अर्ध्या तासापूर्वी राष्ट्राध्यक्ष रूवेन रिवलिन आणि नेसेट अध्यक्ष यारिव लेविन यांना माहिती दिली.


120 सदस्यीय संसद असलेल्या नेसेट मधील नेतन्याहू यांच्या विरोधकांनी एका मागे एक झालेल्या बैठकीत याची घोषणा केली.


लापिद यांनी केला सरकार स्थापनेचा दावा


मूलभूत कायद्याच्या कलम 13(बी) नुसार, मला आपल्याला सांगण्यास अभिमान वाटत आहे की, मी सरकार स्थापनेत यशस्वी झालो आहे. हे एक पर्यायी सरकार असेल आणि एमके (नेसेट सदस्य) नफ्ताली बेनेट हे पहिले पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारतील.


राष्ट्राध्यक्षांकडे सरकार स्थापनेचा दावा


येश अतीद पक्षाचे नेते सरकार स्थापनेचा दावा केला आहे. लापिद हे आता परराष्ट्रमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारतील. औपचारिकपणे शपथ घेण्यापूर्वी संसदेत मतदान होणे आवश्यक आहे.


देशातील सर्वात प्रदीर्घ पंतप्रधान असलेले नेतान्याहू यांनी ट्विट केले की, “मतं घेऊन निवडून आलेल्या सर्व खासदारांनी या धोकादायक डाव्या सरकारला विरोध केलाच पाहिजे.


नेसटचे अध्यक्ष लवकरात लवकर बदलण्यासाठी मतदानासाठी विरोधी पक्षाने गुरुवारी दबाव टाकला. लिकुड पक्षाच्या यारिव लेविन यांना काढून टाकण्यासाठी पावले उचलली गेली जेणेकरुन विश्वासर्शक ठराव जिंकण्यासाठीचा वेळ सत्ताधाऱ्यांना मिळणार नाही.


नेसेटच्या महासचिवांना लिहिलेल्या पत्रात विरोधी पक्षांनी सोमवारी पुढील सत्राच्या अजेंड्यात लेविन यांच्या जागी येश अतीदचे खासदार मिकी लेवी यांना अध्यक्ष बनवण्याचा मागणी केली गेली.


टाइम्स ऑफ इस्रायलने म्हटले आहे की, सरकारच्या शपथविधीपूर्वी नेसेट सदस्यांचा उत्साह थंड तर पडणार नाही याची भीती देखील विरोधकांमध्ये आहे.


दरम्यान, गुरुवारी सकाळी बेनेट यांना पंतप्रधानांना दिली जाणारी शिन बेटची सुरक्षा देण्यात आली.


नेतान्याहू हे प्रदीर्घकाळ काम करणारे इस्त्रायली पंतप्रधान आहेत आणि देशाचे संस्थापक डेव्हिड बेन गुरियन यांचा विक्रम मोडला. 2009 पासून ते या पदावर आहेत आणि ते 1996 ते 1999 या काळात ही पंतप्रधान राहिले.


विशेष म्हणजे नेतान्याहू यांना हटवण्यासाठी एकत्रित झालेल्यांपैकी बरेच जण त्यांचे "नैसर्गिक सहयोगी" आहेत आणि पूर्वी त्यांचे निकटवर्तीय होते.


डावे, उजवे आणि मधले असे सगळे अरब विचारांसह सरकार बनवण्यासाठी एकत्र आले आहेत. याआधी असं कधीच या यहुदी राष्ट्रामध्ये झालं नव्हतं.