444 किलो वजनाचा माणूस इतक्या हलक्या काळजाचा! बायकोने सोडल्याचे दुख: सहन झाले नाही; हृदयविकाराचा झटका आला आणि....
मोरेन याचे वजन तब्बल 444 किलो इतके झाले होते. सर्जरी करून त्याने स्वत:चे 120 किलो इतके कमी केले बहोते. वजन कमी करण्यासाठी तो अथक मेहनत घेत होता. मात्र, त्याचे वजन सातत्याने वाढत होते. या दरम्यान त्याच्या पत्नीने देखील त्याची साथ सोडली. यामुळे तो पूर्णपणे नैराश्यात गेला आणि त्याला जीव गमवावा लागला आहे.
World's fattest man dies : 444 किलो वजनाचा माणूस इतक्या हलक्या काळजाचा निघाला की बायकोने सोडून गेल्याचे दुख: त्याला सहनच झाले नाही. जगातील सर्वात वजनदार माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एंड्रेस मोरेनो(Andres Moreno)याचा पत्नीच्या विरहामुळे मृत्यू झाला आहे. वजन जास्त असल्यामुळे एंड्रेसची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली. यामुळे नैराश्यात गेल्याने हार्ट अॅटेकमुळे त्याचा मृत्यू झाला आहे(World's fattest man dies ).
मोरेन याचे वजन तब्बल 444 किलो इतके झाले होते. सर्जरी करून त्याने स्वत:चे 120 किलो इतके कमी केले बहोते. वजन कमी करण्यासाठी तो अथक मेहनत घेत होता. मात्र, त्याचे वजन सातत्याने वाढत होते. या दरम्यान त्याच्या पत्नीने देखील त्याची साथ सोडली. यामुळे तो पूर्णपणे नैराश्यात गेला आणि त्याला जीव गमवावा लागला आहे.
मॅक्सिको येथे राहणाऱ्या मोरेन याला वाढत्या वजनामुळे दैनंदिन आयुष्यात देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. वजन कमी करण्यासाठी तो अनेक प्रयत्न करत होता. डॉक्टरांच्या मते इमोशनल स्ट्रेस आणि हार्ट अटॅक या कारणांमुळे मोरेनचा मृत्यू ओढावला आहे.
जन्मापासून मोरेन वजनदार
2015 मध्ये एंड्रेस मोरेनोचं वजन तब्बल 444 किलो इतके होते. जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती अशी त्याची ओळख निर्माण झाली होती. जन्मापासून मोरेन वजनदार आहे. नवजात बालकाचे वजन 3 ते 4 किलो पर्यंत असते. परंतु जन्मावेळीच त्याचे वजन तब्बल 5.8 किलो इतके होते. वयाच्या दहाव्या वर्षी एंड्रेसचं वजन 82 किलो इतके झाले.
मोरेनोला एनर्जी ड्रिंक्सची खूप आवड होती. यातूनच मोरेन याला एनर्जी ड्रिंक पिण्याचे व्यसन जडले. यामुळे त्याला मधुमेह झाला. वयाच्या 20 व्या वर्षापासूनच त्याला आरोग्याच्या समस्यांचा त्रास सुरु झाला. मोरेनो यांचे वजन वाढल्याने त्यांना अनेक गंभीर आजारांनी ग्रासले. त्याच्यावर वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.
पत्नी सोडून गेली
मोरोन पोलिस अधिकारी बनला. यानंतर त्याने लग्न केले. पत्नी सोडून गेल्यानंतर मित्र आणि कुटुंबीय त्याला भेटायला यायचे. मात्र, पत्नीच्या सोडून जाण्यामुळे तो भावनिक तणावाखाली होते. यातूनच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.