Crime News: अमेरिकेत एका व्यक्तीने आपल्यात तीन मुलांची गोळ्या घालून हत्या केल्याचं कबूल केलं आहे. Ohio प्रांतात ही घटना घडली असून आपण रायफलने गोळ्या घालून मुलांना ठार केल्याचं त्याने सांगितलं आहे. दरम्यान, जेव्हा मुलीने वडिलांचं हे कृत्य पाहिलं तेव्हा ती बाहेर रस्त्यावर ओरडत सुटली होती. वडिल सर्वांना ठार मारत आहेत असं ती सांगत होती असं वृत्त न्यूयॉर्क पोस्टने दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Clermont County Sheriff कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी तिहेरी हत्याकांडाच्या घटनास्थळी आढळलेल्या 32 वर्षीय चाड डोअरमनवर तीन गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला होता. कोर्टात सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी सांगितलं की, आरोपीने 3,4 आणि 7 वर्षाच्या आपल्या तिन्ही मुलांना रांगेत उभं केलं आणि नंतर अत्यंत योजनाबद्द पद्धतीने गोळ्या घालत ठार केलं. एका मुलाने तेथून पळत शेजाऱ्याच्या शेतात घुसण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी वडिलांनी त्याला शोधलं आणि पुन्हा घऱात आणून गोळ्या घातल्या. 


पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, दोन व्यक्तींनी 911 वर फोन करुन पोलिसांना हल्ल्याची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना घराबाहेर तिन्ही मुलांचे मृतदेह आढळले. 'तिच्या मुलांना गोळ्या घातल्या जात आहेत' असं ओरडणाऱ्या एका महिलेने पहिला कॉल केला असावा. दुसरा फोन एका चालकाने केला होता ज्याने एक मुलगी रस्त्यावर "वडील सर्वांना मारत आहेत" असं ओरडत पळत असल्याचं पाहिलं होतं.


घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी मुलांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मुलं काही प्रतिक्रिया देत नसल्याने अखेर त्यांना मृत घोषित करण्यात आलं अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. 


मुलांच्या आईवरही गोळी झाडण्यात आली असून, तिच्या हाताला जखम झाली आहे. घराबाहेर आढळल्यानंतर तिला तिला सिनसिनाटी येथील युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ती मिस्टर डोअरमनकडून बंदूक काढून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचवेळी तिला गोळी लागली अशी माहिती फिर्यादी वकिलांनी केली आहे. दरम्यान मुलीचे वय आणि ती किती जखमी झाली आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.


हत्या केल्यानंतर आरोपी बाप घराबाहेर बसलेला होता. पोलीस चौकशीत त्याने आपण मुलांना अंगणात उभे केले आणि त्यांच्यावर गोळीबार केल्याचं कबूल केलं. अनेक महिन्यांपासून आपण हत्येची योजना आखत होतो असा खुलासा त्याने केला आहे दरम्यान हत्येमागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही.