फ्रान्समध्ये आढळला मोठा खजिना
खोदकाम करत असताना पैसे, सोनं-चांदीचा खजिना आढळल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. पण आता एक ऐतिहासिक खजिना सापडला आहे.
फ्रान्स : खोदकाम करत असताना पैसे, सोनं-चांदीचा खजिना आढळल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. पण आता एक ऐतिहासिक खजिना सापडला आहे.
फ्रान्समधील चर्च एबी ऑफ क्लनी येथे सोन्याच्या वस्तु आणि २,००० हून अधिक चांदीचे शिक्के आढळले आहेत. हा खजिना मध्ययुगातील असल्याची माहिती समोर आली आहे.
पुरातत्व खात्याच्या अधिखाऱ्यांनी सांगितले की, एखाद्या बंद असलेल्या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात मध्ययुगीन सोन्याचे आणि चांदी शिक्के आढळले आहेत.
नॅशनल सेंटर फॉर सायंटिस्ट रिसर्च (सीएनआरएस)च्या संशोधकांनी सप्टेंबर महिन्यात एबी ऑफ क्लनीमध्ये खोदकाम केलं होतं. त्या दरम्यान हा खजिना आढळला.
संशोधकांना हे खोदकाम करत असताना एबी ऑफ क्लनी येथून फ्रांसिसी मुद्रा २,२०० हून अधिक चांदीचे शिक्के आढळले. हे सर्व शिक्के १२व्या शतकातील आहेत.
हा खजिना कपड्याच्या एका पिशवीत ठेवलेला होता. काही शिक्क्यांवर कपड्यांचे अवशेषही आढळले आहेत. हे शिक्के अल्मोराविद राजवंशाचे अली इब्न यूसुफ (११०६ ते ११४३) दरम्यानच्या काळातील आहेत. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व शिक्के खूपच महाग आहेत.