इस्लामाबाद : एका भारतीय युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे पाकिस्तानात सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. या युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भविष्यवाणी वर्तवली आहे की, २०१७च्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये हिंद महासागरात भूकंप आणि त्सुनामी येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींना पत्र लिहीणाऱ्या या युवकाचे नाव बाबू कलायील असे आहे. मीडिया रिपोर्टनुसार बाबू कलायीलने आपल्या सहाव्या इंद्रियाच्या (सिक्स सेन्स) मदतीने हा दावा केला आहे. आपल्या पत्रात तो म्हणतो की, या वर्षाच्या अखेरीस हिंद महासागरात भूकंप येणार आहे. या भूकंपाच्या लहरींचे रूपांतर त्सुनामीत होईल.


पाकिस्तानात खळबळ


पुढे हा युवक म्हणतो की, या त्सुनामीच्या प्रभावाखाली भारत आणि पाकिस्तानसह आणखी ७ देश येऊ शकतील. विशेष असे की, बाबूने आपल्या पत्रात व्यक्त केलेल्या शक्यतेला कोणताही शास्त्रीय आधार दिला नाही. मात्र, बाबूच्या या पत्रामुळे मात्र पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमध्ये बाबूचा हा इशारा गांभीर्याने घेतला गेल्याचे वृत्त आहे. बाबूची ही भविष्यवाणी पाकिस्तानात सोशल मीडियावर भलतीच व्हायरल झाली आहे.


बाबूच्या या कधीत भविष्यवाणीने म्हणे पाकिस्तान इतका गर्भगळीत झाला आहे की, अशा प्रकारची त्सुनामी जर आलीच तर, काय करायचे याची तयारीही पाकिस्तानात सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या भविष्यवाणीसोबत सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.


सरकारच्या वतीने या भविष्यवाणीबद्दल माहिती देताना पाकिस्तानी हवामान विभागाचे प्रमुख डॉ. गुलाम रसूल यांनी म्हटले आहे की, आयएसआयकडून ही माहिती माळाल्यावर सरकार अशा पद्धतीने नैसर्गीक संकट आल्यावर काय करायचे याबाबत तयारी सुरू करण्यात आली आहे.