पोटात दुखत होतं म्हणून रुग्णालयात गेला; डॉक्टरांनी ऑपरेशन करुन पोटातून बाहेर काढला जिवंत मासा
व्हिएतनाममध्ये एक विचित्र घटना घडली आहे. पोट दुखीची तक्रार घेवून गेलेल्या व्यक्तीच्या पोटातून जिंवत मासा बाहेर काढण्यात आला आहे.
Shocking News : एका व्यक्तीच्या पोटात दुखत होता म्हणून तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी या व्यक्तीची तपासणी केल्यावर त्यांना धक्का बसला. डॉक्टरांनी ऑपरेशन करुन या व्यक्तीच्या पोटातून जिवंत मासा बाहेर काढला आहे. व्हिएतनाममध्ये ही विचित्र घटना घडली आहे. हा अत्यंत दुर्मिळ प्रकार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
मेट्रो यूकेने याबाबतचे वृत्त दिले आहे. क्वांग निन्ह प्रांतातील रुग्णालयात ही आश्चर्यकारक शस्त्रक्रिया पार पडली. व्हिएतनामच्या क्वांग निन्ह प्रांतात राहणाऱ्या एका 34 वर्षीय व्यक्तीच्या पोटात दुखत होते. वेदना असह्य झाल्याने हा व्यक्ती रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी तात्काळ या व्यक्तीच्या अल्ट्रासाऊंड आणि एक्स-रे तसेच अनेक वैद्यकिय तपासण्या केल्या. या व्यक्तीचे मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही हडबडले.
पोटात सापडला 30 सेमीचा मासा
मेडिकल रिपोर्टमध्ये या व्यक्तीच्या पोटात मासा दिसून आला. डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी या व्यक्तीच्या पोटातून जिवंत मासा बाहेर काढला आहे. या मासा 30 सेमी लांबीचा आहे. पोटात दुखण्यासह या व्यक्तीला पोटात काही तरी हालाचाली जाणवत होत्या. मात्र, त्याला नेमकं काय होतयं हे लक्षात आले आहे. मासा पोटात असल्यामुळे या व्यक्तीच्या पोटाला सुज आली तसेच त्याला असह्य वेदना सुरु झाल्या.
पोटात मासा गेला कसा?
पोटदुखीची तक्रार घेऊन आलेल्या या व्यक्तीच्या पोटातून डॉक्टरांनी जिवंत मासा बाहेर काढला आहे. मात्र, मासा या व्यक्तीच्या पोटात कसा गेला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. गुदद्वारातून माशाने व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केला असावा. यानंतर आतड्यांद्वारे हा मासा पोटात गेला असावा असी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे पोटात जिवंत मासा सापडणे हा अत्यंत दुर्मिळ प्रकार असल्याचे डॉक्टर फाम मॅन हंग यांनी सांगितले.
एका बाईनं चक्क दीड किलो सोन्याचे दागिने गिळले
एका बाईनं चक्क दीड किलो सोन्याचे दागिने गिळले. गेल्या 11 महिन्यांपासून ती दागिने गिळत होती. पोटात दुखू लागल्यावर ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यावर तिच्या पोटातून जे काही निघालं, ते पाहून डॉक्टरही दचकले. कोलकात्याच्या बीरभूम जिल्ह्यातल्या रामपुरहाटमधली ही घटना. 21 वर्षांच्या रुनीच्या पोटात दुखायला लागलं म्हणून तिला कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे नेलं. सोनोग्राफी केल्यावर या महिलेच्या पोटात मोठ्या प्रमाणावर धातू असल्याचं समजलं. शस्त्रक्रिया केल्यावर डॉक्टरांना धक्काच बसला... कारण रुनीच्या पोटातून अक्षरशः सोन्याची खाण निघाली. रुनीच्या पोटातून सोन्याचे 80 कानातले, 3 सोन्याची ब्रेसलेटस, 19 अंगठ्या, 8 लॉकेटस, 23 बांगड्या, 11 नथी, एक घड्याळ आणि तब्बल 37 नाणी निघाली.