मेक्सिको सिटी : सेल्व्हाडोर येथील एक नागरिक अमेरिकामधील ग्रेनेड नदी ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात स्वता:चा प्राण गमवून बसला. त्याच्यासोबत असणारी त्यांची दोन वर्षीय मुलीला सुद्धा या भयानक परिस्थिचा तिला सामना करावा लागला. सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत एक व्यक्ती लहान मुलीला मिठीत घेऊन निपचित पडल्याचे दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी भावूक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हा पिता आणि मुलगी मेक्सिकोमधील रियो ग्रेनेड नदी ओलांडून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 


या घटनेनतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा निर्वासितांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. निर्वासित कशाप्रकारे आपला जीव धोक्यात घालतात, हे देखील दिसून येत आहे. 



 


२५ वर्षीय ऑस्कर मार्टिन्स त्याच्या २१ वर्षीय पत्नी व्हॅलेरिया मार्टिन्स आणि मुली बरोबर जोखीम पत्कारून सेल्व्हाडोर येथून निघाले होते. त्यांना अमेरिकेत जायचे होते. ऑस्करने त्याच्या मुलीला स्व:च्या पाठीवर घेतले होते. मात्र, पाण्याच्या प्रचंड वेगामुळे हे दोघेही वाचू शकले नाहीत. मात्र त्याची पत्नी सुखरुप नदीच्या किनाऱ्यापर्यंत जाऊ पोहचली.


मेक्सिकोच्या तमौलिपस राज्यातील मटामोरोसमधील नदीच्या किनारी बाप लेकीचा मृतदेह सापडला. फोटोमध्ये ऑस्कर आणि त्यांच्या मुलीचा मृतदेह पाण्यात पडलेला दिसत आहे. मृत्यूनंतरही दोघे एकमेकांच्या मिठीत असल्याचे दिसत आहे. या घटनेने मेक्स्किोमधील अनेकजणांनी प्रचंड संताप व्यक्त केला. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जगभरातून अनेजण टीका करत आहे. ट्रम्प यांचे सीमारेषा धोरण यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.