पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा प्रकार घडला आहे. रॉनी विग्स असं पतीचं नाव असून त्याने आपण पत्नीचं मेडिकल बिल भरण्यात असमर्थ ठरल्याने हे कृत्य केल्याचा दावा केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास इंडिपेंडन्स, मिसूरी येथील सेंटरपॉइंट मेडिकल सेंटरमध्ये घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीमध्ये रुग्णावत अत्याचार झाल्याची माहिती देण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. केसीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जॅक्सन काउंटीचे वकील जीन पीटर्स बेकर यांच्या म्हणण्यानुसार, पीडितेला डायलिसिससाठी नवीन पोर्ट मिळत होता.


फिर्यादींनी केलेल्या आरोपानुसार, महिला हॉस्पिटलच्या बेडवर असताना रॉनी विग्सने तिचा गळा दाबण्यास सुरुवात केली. तिला मदतीसाठी हाक मारण्यापासून रोखण्यासाठी त्याने तिचे तोंड आणि नाक झाकलं होतं, असं फिर्यादींनी सांगितलं आहे.


कोर्टात जमा करण्यात आलेल्या नोंदींनुसार पोलीस जेव्हा रुग्णालयात दाखल झाले तेव्हा पीडित महिलेच्या शरिराची कोणतीही हालचाल होत नव्हती. पण तरीही तिला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. तिचा मेंदूही काम करत नसल्याचं लक्षात आल्यानंतर अखेर लाईफ सपोर्ट काढून घेण्यात आला. 


रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रॉबिन विंग्स यांना आपण हत्या केल्याचं बोलताना ऐकलं. "मीच केलं. मी तिची हत्या केली. मी तिचा गळा दाबला," असं रॉबिन विंग्स म्हणाल्याचा पुरावा कोर्टात देण्यात आला आहे. 


रॉबिन विंग्स याला प्रथम श्रेणीच्या घरगुती हल्ल्यासाठी अटक करण्यात आली. इंडिपेंडन्स पोलीस विभागाने ही कारवाई केली. चौकशीदरम्यान, त्याने पत्नीसाठी नवीन डायलिसिस पोर्ट घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं. तंसंच पत्नीला आरडाओरडा करण्यापासून रोखण्यासाठी तिचे नाक व तोंड झाकले आणि अंगठा तिच्या गळ्यात घातल्याची कबुल त्याने पोलिसांकडे दिली. 


फॉक्सने दिलेल्या वृत्तानुसार, पतीने आपण आर्थिकदृष्ट्या आव्हानांचा सामना करत होतो. तसंच मानसिक तणावात होतो. यातूनच पत्नीची हत्या केली अशी कबुली दिली आहे. तसंच आपण याआधीही दोनदा असे प्रयत्न केल्याची कबुलीही दिली आहे. मागील हॉस्पिटल आणि पुनर्वसन भेटींदरम्यान आपण दोनदा तिला मारण्याचा प्रयत्न केला असं त्याने सांगितलं आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.