१३ लाख रुपये किमतीची लक्झरी हँडबॅग, या कारणामुळे करावी लागली नष्ट
एका महिलेने स्वत:साठी १९,००० अमेरिकन डॉलरची ( सुमारे १३ लाख रुपये) एक लक्झरी बॅग (Imported Handbag) आयात करत खरेदी केली, परंतु ती बॅग ही महिला वापरु शकली नाही.
पर्थ : ऑस्ट्रेलियामधील एका महिलेने स्वत:साठी १९,००० अमेरिकन डॉलरची ( सुमारे १३ लाख रुपये) एक लक्झरी बॅग (Imported Handbag) आयात करत खरेदी केली, परंतु ती बॅग ही महिला वापरु शकली नाही. उलट त्यांना ती बॅग नष्ट करण्यास भाग पडले. इतका महागडा केलेला सगळा खर्च एका कारणामुळे वाया गेला आहे. केवळ एक परवाना घेतला नसल्याने बॅगवर पाणी सोडावे लागले.
वास्तविक, ही बॅग मगरीच्या त्वचेपासून (Alligator-Skin) बनविण्यात येते. अॅलिगेटर-स्कीनची बॅग असल्याने यासाठी एक परवनागी घ्यावी लागते. या बॅगेच्या मालकिनने नियमांनुसार ७० डॉलरचा (पाच हजार) परवाना घेणे गरजेचे होते. तो तिने परवाना घेतलेला नव्हता. म्हणून त्यांना बॅग नष्ट करावी लागली आहे.
पर्थमधील ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सने (Australian Border Force) फ्रान्समधील (France) सेंट लॉरंट बुटीकमधून आलेली लक्झरी बॅग जप्त केली. या जप्तीमागे असा उद्देश होता की, अवैधपणे वन्यजीव व्यापारात सहबागी होऊ नये.
फ्रान्सहून हँडबॅग्ज पाठविणार्या दुकानदाराने सीआयटीईएस (CITES) निर्यात परवान्याची व्यवस्था केली होती. तरी ऑस्ट्रेलियन सीआयटीईएस व्यवस्थापन प्राधिकरणाने आयात परवान्यासाठी अर्ज केला नाही. त्यामुळे असे पाऊल उचलावे लागले.
ऑस्ट्रेलियामध्ये वन्यप्राण्यांपासून उत्पादन बनविण्यावर बंदी आहे. त्यामुळे मगरीच्या त्वचेपासून किंवा प्राण्यांपासून बनविलेल्या उत्पादनांनाबाबत काटेकोरपणे पालन केले जात. दुर्मिळ होत नाजाणाऱ्या किंवा नष्ट होणाऱ्या प्रजापतींपासून वस्तूवर बंदी आहे. तसेच अवैधपणे व्यापार करणे हेही चुकीचे आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात या लक्झरी बॅगची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तसेच धोकादायक असणाऱ्या प्रजातींचा अवैध व्यापार रोखण्यासाठी हे केले जाते.
ऑस्ट्रेलियामध्ये वन्यजीवांशी संबंधित व्यापार करणाऱ्यांना किंवा त्याबाबत व्यापार सहभागी झाल्यास जास्तीत जास्त १० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा असून १६०,००० डॉलर (१ कोटी रुपयांपैक्षा जास्त) आर्थिक दंड होऊ शकतो.
ऑस्ट्रेलियन पर्यावरण मंत्री सुसान ले यांनी ही योग्य कारवाई असल्याचे सांगत 'महागडे स्मरण' म्हणून संबोधले. तसेच, देशातील नागरिकांना सांगितले की, त्यांनी फॅशनच्या नैतिक निवडीबद्दल विचार केला पाहिजे. आपण ऑनलाईन काय खरेदी करतो याविषयी आपण सर्वांनी जागरूक असण्याची गरज आहे, कारण नष्ट होत असलेल्या प्रजातींच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी प्राणी उत्पादनांचा व्यापार थांबविण्यासाठी अटकाव असला पाहिजे. नियमांचे पालन करण्याव्यतिरिक्त, लोक फॅशनच्या नैतिक निवडीबद्दल विचार करणे महत्वाचे आहे.