आपल्याला सर्वांना कधीनाकधी एक जॅकपॉट लागावा असं कायम वाटत असतं. पण प्रत्येकाचं नशीब फळफळतंच असं नाही. मात्र ही बातमी वाचून तुमच्यासोबतही असं काहीसं व्हावं असं तुम्हाला नक्की वाटेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका महिलेने ऑनलाईन एक सेकंड हॅन्ड सोफा मागवला. घरी सोफा आल्यानंतर त्याची नितंब तपासणी केली. तपासणी करताना तिच्यासोबत एक थक्क करणारी घटना घडली. तिने विकला घेतलेल्या सोफ्याच्या एका कुशनमधून या महिलेला तब्बल २८ लाख रुपये मिळाले.


हा सर्व प्रकार घडलाय अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधला. विक्की उमोडु  नामक एक महिला आपल्या घरासाठी ऑनलाईन फर्निचर शोधत होती. एका वेबसाईटवर त्यांना एक सोफा आणि त्यासोबतच्या दोन मॅचिंग खुर्च्या दिसल्यात. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व सामान वेबसाईटवर फ्री मध्ये उपलब्ध होतं.  


सर्व गोष्टी फ्री असल्याने या महिलेला सर्वात आधी ही मस्करी वाटली. या महिलेने त्या वेबसाईटवर फोन करून याबाबत अधिक विचारपूस करण्याचा निर्णय घेतला. फ्रीमध्ये फर्निचर देणाऱ्या कुटुंबीयांनी सांगितलं की नुकतंच त्यांच्या कुटुंबामध्ये एकाचं निधन झालंय. म्हणूनच आम्ही त्या जागेववरील सर्व सामान हटवण्याच्या विचारात आहोत.


ज्या महिलेला हा जॅकपॉट लागला ती महिला नुकतीच नव्या घरात शिफ्ट झाली होती. नवीन घरात बरंचसं सामान नव्हतं. नवीन घरात शिफ्ट होण्याच्या आनंदात तिनं हा सोफा घेतला. सोफा घरी आल्यानंतर या महिलेने घरी आलेल्या सामानाची तपासणी केली.


विक्की उमोडुने याबाबत अधिक माहित दिली ती थक्क करणारी होती. त्यांना आधी हे हिट पॅड असल्याचं भासलं. त्यानंतर त्यांनी कुशनची चेन उघडली. त्यात बरेसचे एनव्हलप होते, ज्यात डॉलर्स असल्याचं समोर आलं. या सोफ्याच्या कुशनमध्ये जवळजवळ 28 लाख रुपये असल्याचं समजलं.  


विक्की उमोडुने सोफ्यात कॅश असल्याचं समजल्यावर तात्काळ ज्यांच्याकडून सोफा घेतला त्यांना फोन करून याबाबत संपूर्ण माहिती दिली आणि पैसे परत केले. ज्यांनी हा सोफा विकायला काढलेला त्यांनाही याबाबत काहीही ठाऊक नव्हतं. मात्र विक्की उमोडुवर खुश होऊन त्यांनी तिला दोन लाखांचं बक्षीस दिलं.