VIDEO VIRAL : सध्या सोशल मिडियावर मेकअप टुट्योरियलचे व्हिडिओ चांगलेच ट्रेंडिंगमध्ये आहेत. या ट्रेंडिग व्हिडिओवर अनेक सोशल Influencer तसेच तरुणी झटपट मेकप करुन दाखवतात. तर, अनेक तरुणी मेकअप आणि ब्युटी टीप्स देत असतात. अशाच एका Influencer तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ही   Influencer तरुणी 10 हजार फूट उंचीवर हवेत तरंगत मेकअप करत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.  वो स्त्री है कुछ भी कर सकती है... अस म्हणत अनेक या तरुणीचा व्हिडिओ रिशेअर करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

McKenna Knipe नावाच्या Instagram अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. McKenna नावाची तरुणी या व्हिडिओमध्ये हवेत मेकअप करताना दिसत आहे. ही तरुणी पॅराग्लायडींग करत मेकअप करत आहे. डिसेंबर 2022 मध्ये तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर, 18 हजार लोकांपेक्षा अधिकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तर या व्हिडिओवर कमेंट्सचा देखील वर्षाव होत आहे.


स्काई डाइविंग करत केला मेकअप


तुमची स्किन केअर रूटीन काय आहे? असं म्हणत McKenna नावाने 10 हजार फूट उंचीवरुन मेकअप करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मॅकेन्ना मेकअपच्या सर्व स्टेप्स फॉलो करताना दिसत आहे. स्काई डाइविंग करताना वाऱ्याचा प्रचंड वेग आहे.  मॅकेन्ना प्रथम जोरदार वार्‍यामध्ये चेहऱ्यावर क्लिंझर लावते. यानंतर ती बाटलीच्या पाण्याने कपडा ओला करून चेहरा स्वच्छ करते. यानंतर ती चेहऱ्यावर प्राइमर लावते. यानंतर शेवटी ती फाउंडेशन लावून बेस सेट करते. 10 ते 15 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे.



स्काई डाइविंग करताना केल्या अनेक Activity


McKenna च्या Instagram अकाऊंटवरुन स्काई डाइविंग करतानाचे अनेक व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये ती स्काई डाइविंग करताना अनेक Activity करत असल्याचे दिसत आहे. कधी ती हवेत तरंगत पिझ्झा खात आहे तर कधी बर्गर खाताना दिसत आहे. तर आणखी एका व्हिडिओमध्ये McKenna स्काई डाइविंग करत असलेल्या दोघा तरुणांच्या पायाला लटकलेली दिसत आहे.