आफ्रिका : बाहेरील देशातील सेलिब्रिटी काहीना काही विवादात्मक गोष्टी शेअर करत असल्याचे नेहमीच आपल्याला ऎकू येत असते. अशीच एक गोष्टी आफ्रिकेतील घाना देशामधील आहे. घाना देशच्या राजधानी अक्रामध्ये (Accra) रहाणाऱ्या एका अभिनेत्रीला आपल्या मुलासह न्यूड फोटो शेअर करणे महागात पडले आहे. कोर्टाने अभिनेत्रीला याप्रकारामुळे 3 महिन्यांसाठी तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, कोर्टाच्या या निर्णयावर लोकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमेरिकन रॅप स्टार कार्डी बीसह (Cardi B) अनेक सेलिब्रिटींनी ही शिक्षा अत्यंत कठोर असल्याचे म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री रोझमंड ब्राउन (Rosemond Brown), तिली अकुपम पोलो (Akuapem Poloo) नावाने देखील ओळखले जाते, तिने तिच्या मुलाच्या सातव्या वाढदिवशी न्यूड फोटोशूट केले आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


मागील वर्षीचे फोटोशूट


'द सन' च्या अहवालानुसार 31 वर्षीय अकुपम पोलो ही सिंगल मदर आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये तिने आपल्या मुलाच्या सातव्या वाढदिवसाच्या निमित्ताने न्यूड फोटो काढला. ज्यामध्ये ती आपल्या मुलाचा हात धरून बसली आहे. अकुपम पोलोने हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यामुळे हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे.


न्यायाधीशांचे अभिनेत्रीला प्रश्न


घाना देशाची राजधानी अक्रा (Accra) येथील एका कोर्टाने अभिनेत्रीच्या या वागण्याला गंभीर मानले आहे. कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, अकुपम पोलोने अश्लील फोटो सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तिने जे केले ते घरगुती हिंसाचारात येते, कारण यामुळे एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयता आणि सन्मानाचे नुकसान होते. न्यायाधीश क्रिस्टियाना कॅनने (Christiana Cann) पोलोला विचारले की, तिने हे न्यूड फोटो फोटो पोस्ट करण्यापूर्वी मुलाची परवानगी घेतली होती का? तिने तिच्या मुलाच्या हक्कांचा आदर केला आहे का?


न्यायाधीश क्रिस्टियानाच्या म्हणण्यानूसार अकुपम पोलोने आपल्या मुलाच्या परवानगी शिवाय हे फोटो काढले आणि शेअर केले आहे आणि हा एक अपराध आहे. न्यायाधीशांनी सांगितले की, त्यांना माहित आहे की, पोलो सिंगल मदर आहे. त्यामुळे ती जर तुरूंगात गेली तर यामुळे तिच्या मुलाला याचा त्रास होईल. परंतु त्यांचे असेही म्हटले आहे की, अशा प्रकरणांमध्ये शिक्षा होणे आवश्यक आहे जेणेकरून इतरांना धडा मिळेल. त्यावर अभिनेत्रीच्या वकिलाने असे म्हटले आहे की, या निर्णयाच्या विरोधात ते हाय कोर्टात अपील करणार आहेत. ते म्हणाले की, अकुपम पोलोने जे केले त्यासाठी 90 दिवसांची तुरूंगवासाची शिक्षा खूप जास्त आहे आणि आम्ही या निर्णया विरोधात अपील करू.


ट्वीटरवर मोहीम


अभिनेत्री अकुपम पोलोला मिळालेल्या या शिक्षेला विरोध करण्यासाठी इतर लोकांनीही तिला सपोर्ट करायला सुरुवात केली आहे. ट्वीटरवर 18 मिलियन फॉलोअर्स असलेल्या अमेरिकन रॅप स्टार कार्डी बीने (Cardi B) कोर्टाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, ''मी अनेक अमेरिकन लोकांना असे फोटोशूट करतांना पाहिले आहे. मी या गोष्टीशी सहमत नाही, परंतु यासाठी अकुपम पोलोला दिलेली शिक्षा खूप जास्त आहे." त्याचबरोबर ट्वीटरवर लोकं  #FreeAkuapemPoloo या हॅशटॅगसह अभिनेत्रीला तुरूंगातून सोडण्याचे आवाहन करत आहेत