Artificial Grass: बिकनी गर्ल आणि गवत कापण्याचा काय संबंध? कुत्रिम ग्रास कंपनीची जाहीरात वादात
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या कल्पक जाहीराती तयार करतात, पण सध्या एका जाहीरातीवरुन चांगलाच वाद रंगला आहे
Artificial Grass Firm Bikini Girl: कोणत्याही गोष्टीचं मार्केटिंग करायचं असेल तर जाहीरात ही महत्त्वाची असते. लोकांना त्या उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी कंपनी एकाहून एक कल्पक जाहीराती तयार करतात. जितकी चांगली जाहीरात तितकीच त्याची चर्चाही जोरदार होते. पण काही जाहीराती अशा असतात ज्याचा त्या उत्पादनाशी काहीही संबंध नसतो. सध्या अशाच एका जाहीरातीवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या जाहीरातीत बिकनी घातलेली मुलगी दाखवल्याने जाहीरातीविषयी चर्चा सुरु झाली आहे.
ग्रास कंपनीच्या जाहारातीत बिकनी गर्ल
कुत्रिम गवत बनवणाऱ्या कंपनीची ही जाहीरात आहे. ब्रिटनमध्ये या कंपनीकडून शहराच्या मध्यभागी कंपनीच्या जाहारीतीचा मोठा बोर्ड लावण्यात आला. या बोर्डवर त्या कंपनीने आपल्या कंपनीचे संपर्क क्रमांक आणि कंपनीचं काम दर्शवणारं एक चित्र दाखवलं आहे. पण या चित्रात गवत कापणारी मुलगी बिकनीत दाखवण्यात आली आहे.
बिकनी घालून गवतावर पहुडलेली मुलगी
जाहारीतीत बिकनी घातलेली एक मुलगी बिकनी घालून गवतावर झोपली आहे आणि तिच्या हातात एक यंत्र दाखवण्यात आलं आहे. हे गवत वापरण्यास खूपच मुलायम असून यासाठी आम्हाला संपर्क करा, असं या जाहीरातीतून सांगण्यात आलं आहे.
शहरात अनेक ठिकाणी या कंपनीने आपले मोठ-मोठे होर्डिंग्स लावले आहेत. सोशल मीडियावर या जाहीरातीचे फोटो व्हायरल होताच, मोठा वाद निर्माण झाला आहे. बिकनी आणि गवत कापण्याचा काय संबंध? झोपून गवत कापण्याची ही कोणती पद्धत असे प्रश्न नेटिझन्स विचारतायत. इतकंच काय तर काही लोकांनी होर्डिंग लावलेल्या ठिकाणी जाऊन निदर्शनंहीकेली.
लोकांचा वाढता विरोध पाहाता शेवटी कंपनीला एक पाऊल मागे जावं लागलं. या कंपनीने जाहीरातीतून बिकनी गर्लचा फोटो हटवला आणि नव्याने जाहीरात प्रसिद्ध केली.