तालिबानचं आणखी एक नवीन फर्मान; महिला टीव्ही अँकरर्सवर घातले बंधन
अफगाणिस्तानचा ताबा घेणारे तालिबान जनतेसाठी नवनवीन फर्मान काढतं असतं. आता पुन्हा एकदा तालिबानने नवीन फर्मान काढलेय.
मुंबई : अफगाणिस्तानचा ताबा घेणारे तालिबान जनतेसाठी नवनवीन फर्मान काढतं असतं. आता पुन्हा एकदा तालिबानने नवीन फर्मान काढलेय. या नवीन आदेशानुसार आता देशातील सर्व महिला टीव्ही अँकरने ऑन एअर असताना त्यांचे चेहरे झाकणे आवश्यक असल्याचे सांगितलेय. तालिबानच्या या आदेशाचा मानवी हक्क आयोगाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केलाय.
तालिबानने गुरुवारी देशातील सर्व महिला टीव्ही अँकरने ऑन एअर असताना त्यांचे चेहरे झाकणे आवश्यक असलेला आदेश लागू केला. यावेळी काही माध्यमांनी त्याचे पालन केले, तर काही माध्यम या नियमांच पालन करत नव्हत. मात्र रविवारी तालिबानकडून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. यानंतर बहुतांश मीडिया संस्थांमध्ये महिला टीव्ही अँकर तोंड झाकून बातम्या वाचताना दिसल्या.
टोलोन्यूजची टीव्ही अँकर सोनिया नियाझीने यावर म्हटले की, "ही केवळ एक बाह्य संस्कृती आहे जी आपल्यावर लादली गेली आहे, जी आपल्याला आपले चेहरे झाकण्यास भाग पाडते. ती पूढे म्हणते की यामुळे अँकरींग करताना आम्हाला खूप त्रास झाला आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या संघटनेने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यापासून अफगाण महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. तरुण मुली आणि महिलांवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. त्यात आता देशातील महिला टीव्ही अँकरना ऑन एअर असताना चेहरे झाकण्याचे आदेश दिलेत.तालिबानच्या या आदेशाचा मानवी हक्क आयोगाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केलाय.