अफगाणिस्तानातील मुलीचा व्हिडीओ व्हायरल...म्हणाली `आम्ही हळूहळू इतिहासात होणार नष्ट...`
एका अफगाण मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली असहायता लोकांपर्यंत पोहोचवली आहे.
मुंबई : तालिबानने अफगाणिस्ताना आपल्या ताब्यात घेतल्यानंतर तिथील लोक खूप घाबरले आहेत. प्रत्येक लोकांना आता एकच प्रश्न पडला आहे की, आता आपले भविष्य कसे असेल. त्यामुळे सगळेच लोकं आता चिंतित आहेत. आतापर्यंत तुम्ही टिव्हीवर किंवा सोशल मीडियावर काबूलमध्ये असलेल्या विमानतळाचे भयानक दृश्य पाहिलेच असेल. लोकं अफगाणिस्तानातून पळून जाण्यासाठी जीवाचा आकांत करत आहे.
या सगळ्यात एका अफगाण मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली असहायता लोकांपर्यंत पोहोचवली आहे. ती मुलगी व्हिडीओमध्ये म्हणत आहे की, आम्ही हळू हळू करुन सगळेच मरणार आहोत.
या व्हिडीओत ती मुलगी आपली असहाय वेदना अफगाणी भाषेत व्यक्त करत आहे. ती रडत सांगत आहे की, आमच्या असल्याने किंवा नसल्याने कोणालाही फरक पडत नाही, कारण आमची चूक एवढीच आहे की, आम्ही अफगाणिस्तानात जन्मलो आहोत. आता मला माझे अश्रू पुसावे लागतील, कारण खरोखरच कोणीही आमची काळजी करत नाही. आम्ही हळूहळू इतिहासात नष्ट होऊ.
या व्हिडीओमध्ये, या मुलीने अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती अत्यंत कळकळीने लोकांसमोर मांडली आहे. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनीही दु: ख व्यक्त करायला सुरुवात केली. एका वापरकर्त्याने लिहिले की, तुमच्या लोकांवर काय परिस्थिती ओढावली आहे याची आम्हाला जाणीव आहे. पण आम्ही काहीही करू शकत नाही. त्याचवेळी दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, मुलीचे डोळे सांगत आहेत की तिचे आयुष्य किती वाईट झाले आहे. मला माहित नाही की जगभरातील लोक शांतपणे का बसले आहेत, तर एकिकडे मानवता मरत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना खूप वाईट वाटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातून असे काही व्हिडीओ समोर येत आहेत, जे पाहून बऱ्याच लोकांना धक्का बसला आहे. तुम्ही काबूल विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानाचा व्हिडीओ देखील पाहिला असेव ज्यामध्ये लोकांनी विमानात चढण्यासाठी जीवाचा आकांत केला आहे. या विमानाच्या टायरला धरून तीन लोकांनी जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला.