काबूल : अफगाणिस्तानातील काबूलमध्ये कनिष्ठ सभागृह सल्लागार पदी कार्यरत असलेल्या महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली. मेना मंगल कामावर जात असताना अज्ञात व्यक्तींनं त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. मेना मंगल या कनिष्ठ सभागृहात सल्लागार या पदावर कार्यरत होत्या. या घटनेत एकाहून अधिक व्यक्ती असल्याचा संशय गृहमंत्रालयाकडून व्यक्त करण्यात येत आहे.  याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काबूल परिसरात एका मार्केटजवळ त्यांची हत्या करण्यात आली. दोघेजण मोटारसायकवरुन आले होते. ते मेना येणाऱ्या कारची वाट पाहत होते. मोटारसायकलवरील बंदूकधाऱ्याने जवळून गोळ्या घातल्या. मेना यांच्या छातीत गोळ्या घुसल्याने त्या खाली कोसळल्या, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.  दरम्यान, मेना यांनी २०१७ मध्ये आपल्या मनाविरुद्ध होणाऱ्या विवाह आणि घटस्फोटाविषयी लिखान केले होते. त्यांनी हे लिखान सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावेळी त्यांना अज्ञाताकडून धमकी मिळाली होती, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.



मंत्रालयाच्या एका प्रवक्ता नसरत रहिमी सांगितले की, एक संशयीत हल्लानंतर घटनास्थळावरुन पळून गेला आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. काबूल पोलिसांनी सांगितले की या हत्येमागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे किंवा व्यक्तिगत वादातून ही हत्या झाली आहे. दरम्यान, इस्लामिक स्टेट आणि तालिबान दहशवादी संघटना कायम अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये हल्ले करत आले आहेत.