वॉशिंग्टन : Afghanistan Crisis : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने (Taliban) ताबा मिळाल्यानंतर परिस्थिती बिकट होत चालली आहे आणि लोकांना कोणत्याही किंमतीत देशाबाहेर जायचे आहे. यासाठी, बहुतेक लोक काबूल विमानतळावर (Kabul Airport) जमले आहेत. परंतु यादरम्यान अमेरिकेने मोठ्या धोक्याबद्दल इशारा (US Warns Terror Attack threat at Kabul Airport) जारी केला आहे आणि तेथील नागरिकांना काबूल विमानतळापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.


काबूल विमानतळावर होऊ शकतो दहशतवादी हल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काबूल विमानतळावर  (Kabul Airport) दहशतवादी हल्ल्याचा धोका वाढल्याने (Terror Attack threat at Kabul Airport) अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहावे आणि काबूल विमानतळावर जाऊ नये, असा इशारा दिला आहे. अमेरिका व्यतिरिक्त ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियानेही आपल्या नागरिकांना सावध केले आहे.


नागरिकांनी विमानतळावर जाणे टाळावे: अमेरिका


अमेरिकेने अलर्ट जारी केला, 'काबूल विमानतळाबाहेरच्या (Kabul Airport) धोक्यांमुळे अमेरिकन नागरिकांनी विमानतळावर जाणे टाळावे. याशिवाय, लोकांनी विमानतळाच्या गेटवर जाणे देखील टाळावे, जोपर्यंत तुम्हाला तसे करण्याच्या सूचना मिळत नाहीत, तोपर्यंत विमानतळावर जाऊ नका. जे नागरिक एबी गेट, ईस्ट गेट किंवा विमानतळाच्या उत्तर गेटवर आहेत, त्यांनी त्वरित निघून जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


काबूलमधून आतापर्यंत हजारो लोकांना बाहेर काढण्यात यश


अफगाणिस्तानवर (Afghanistan Updates) तालिबानने (Taliban) कब्जा मिळविल्यापासून अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि भारतासह अनेक देश काबुलमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यात गुंतले आहेत. 14 ऑगस्टपासून काबूल विमानतळावरून लोकांसाठी बचावकार्य सुरू आहे आणि आतापर्यंत हजारो लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.