Blast In Kabul: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये (Kabul Blast) आज (शुक्रवारी) सकाळी मोठा स्फोट (Blast) झाला असून त्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 40 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तालिबानचे प्रवक्ते खालिद झदरान यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी दश्ती बर्ची भागात हा स्फोट झाला. अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शिया समुदायाचे (Shia Community) बहुतांश लोक या भागात राहतात. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालिबानचे प्रवक्ते खालिद झदरन (Taliban) यांनी सांगितले की, मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा आकडा मोठा आहे. स्फोट झाला विद्यार्थी तेव्हा विद्यापीठात प्रवेश परीक्षा देत होते. ज्या शैक्षणिक केंद्रांना लक्ष्य केले जात आहे त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अफगाण पीस वॉच या स्वयंसेवी संस्थेने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, विद्यार्थ्यांमध्ये येत एका दहशतवाद्याने स्वतःला स्फोटाने उडवून दिलं. काज शैक्षणिक केंद्राला लक्ष्य करण्यात आले. नुकताच काबूलमधील वजीर अकबर खान परिसरात बॉम्बस्फोट झाला होता.



काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर नुकत्याच झालेल्या स्फोटाचाही तीव्र निषेध करण्यात आला होता. गेल्या वर्षी अमेरिकेचे समर्थन असलेले सरकार पाडल्यानंतर तालिबानच्या राजवटीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. असं असतानाही अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका सुरूच आहे.