काबुल : अफगाणिस्तान (Afghanistan) वर तालिबानने कब्जा केल्यानंतर महिला अधिकच असुरक्षित आहेत. तालिबानचं शासन हे नरकापेक्षा काही कमी नाही. तसेच महिलांना आपल्या सुरक्षेसोबतच लहान मुलांची देखील काळजी आहे. तालिबानी दहशतवादी खासकरून महिलांवर निशाणा साधतात. याच दरम्यान अफगाणास्तानात मुलींसाठी एकमात्र बोर्डिंग स्कूल (Afghanistan Lone All-Girls Boarding School) आहे. याचे सहसंस्थापकांनी बोर्डिंग स्कूलमधील मुलींचे सगळे रेकॉर्ड बुक केले आहेत. हे करून त्यांनी विद्यार्थीनींना दहशतवाद्यांकडून वाचवलं आहे. 


मुख्याध्यापिकांना सतावतोय धोका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोर्डिंग स्कूलचे सह-संस्थापक आणि मुख्याध्यापिका शबाना बासिज-रसिख (Shabana Basij-Rasikh)याबाबत ट्विट करून माहिती मिळाली आहे. त्यांच म्हणणं आहे की,'मुलींच रेकॉर्ड जाळण्यामागचा हेतू आहे त्यांची' सुरक्षा निश्चित करणे. शबाना यांना भीती आहे की, शाळेतील रेकॉर्डच्या मदतीने तालिबानी मुलींपर्यंत पोहोचतील आणि त्यांना त्रास देतील. यामुळे त्यांनी आपला जीव धोक्यात टाकून मुलींचा सर्व रेकॉर्ड जाळला. त्यांना अशी देखील भीती आहे की, याकरता तालिबानी मुलं त्यांना जीवे मारतील. मात्र त्यांना मुलींची चिंता आहे. 



शबाना यांनी वैयक्तिक अनुभव शेअर केला


एक वैयक्तिक अनुभव आठवत शबाना म्हणाली की मार्च 2002 मध्ये तालिबानच्या पराभवानंतर हजारो अफगाण मुलींना जवळच्या पब्लिक स्कूलमध्ये प्लेसमेंट परीक्षेसाठी आमंत्रित करण्यात आले होते, कारण तालिबानने सर्व महिला विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड जाळले होते. मी सुद्धा त्या मुलींमधील एक होते. या घटनेनंतर मी अफगाण मुलींना शिक्षण देण्याचे मिशन सुरू केले.


म्हणून Tweet करून दिली माहिती 


शबाना बसीज-रसिख यांनी गरीब असलेल्या आणि अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा मार्ग नसलेल्या मुलींना शिक्षण देण्याचे वचन दिले. मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, पूर्वीच्या तालिबान राजवटीत महिलांची स्थिती नरकापेक्षा वाईट होती. ते पुढे म्हणाले, माझ्या सर्व विद्यार्थिनी आणि बोर्डिंग स्कूल चालवण्यात मदत करणाऱ्या गावातील सर्व लोक याक्षणी सुरक्षित आहेत. मी नोंदी जाळण्याची बाब सार्वजनिक केली जेणेकरून मी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना संदेश पाठवू शकेन की तालिबान त्यांच्यापर्यंत कागदपत्रांद्वारे पोहोचू शकणार नाही.


इस्लामिक दहशतवादी संघटना तालिबानने या वेळी १. ० च्या क्रूर राजवटीपेक्षा वेगळ्या प्रकारचे शासन चालवण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या वेळी अफगाणिस्तानातील महिलांना त्यांच्या घरातच मर्यादित ठेवण्यात आले होते आणि नियम मोडल्याबद्दल बाजारात महिलांना जाहीर मारहाण करण्यात आली होती.