Cruel Face of Taliban: अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर जगासमोर बदलाचा मुखवटा दाखवणाऱ्या तालिबानने आता आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे.  तालिबान्यांकडून अफगाणिस्तानात एक फर्मान काढले जात आहे, ज्यावरून उघडपणे मानवी हक्क आणि महिलांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांसाठी बुरखा अनिवार्य केल्यानंतर आता तालिबानने पती-पत्नीला रेस्टॉरंटमध्ये बसण्यासही मज्जाव केला आहे.


पती-पत्नी रेस्टॉरंटमध्ये बसू शकत नाहीत
अफगाणीस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर तालिबानी सरकारने उदारमताने राज्य करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण या भूमिकेपासून त्यांनी लवकरच फारकत घेतल्याचं दिसतंय. तालिबानने आता नवं फर्मान काढलं आहे. पती-पत्नीने कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये एकत्र बसणं हा गुन्हा घोषित केला आहे. असे केल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.


रेस्टोरंट मालकांना दिले आदेश
तालिबानी सरकारी अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  रेस्टॉरंटमध्ये महिला आणि पुरुषांना वेगळं बसण्याची व्यवस्था करण्याचे आदेश रेस्टोरंट मालकांना दिले आहेत. मग ते पती-पत्नी असले तरी त्यांनाही तोच नियम लागू असेल, अशी ताकीदही देण्यात आली आहे. 


टॅक्सीत एकत्र बसणं देखील गुन्हा
तालिबानमधल्या हेरातमध्ये पुरुष साथीदारांशिवाय टॅक्सीत बसणंही गुन्हा आहे. इतकंच नाही तर शाळेत शिकणाऱ्या मुलींना त्यांच्यासोबत शिकणाऱ्या पुरूष वर्गमित्रांसह फोटो काढल्याबद्दल शिक्षा दिली जाते.