काबूल : तालिबानी अफगाणिस्तान सत्तास्थापन करण्यात यशस्वी ठरले आहेत. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हे अफगाणिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान असणार आहेत. तर अब्दुल गनी बरादर हे उपपंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. अफगाणिस्तान तालिबान्यांची सत्तास्थापन होताच ड्रॅगन चीनने आपली भूमिका मांडली आहे. अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्तास्थापन झाल्याने अराजकतेचा अंत झाल्याचं म्हंटलंय. तसेच चीनने आपल्या जुन्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. संघटनेने व्यापक आधारित राजकीय रचना तयार करायला हवी. सोबत देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणाचे पालन केले पाहिजे. (Afghanistan will resolutely confront all terrorist forces says Chinese Foreign Ministry spokesman Wang Wenbig) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालिबानने मंगळवारी अंतरिम सरकारमधील 33 जणांच्या नावाची घोषणा केली. या मंत्रिमंडळात ही दहशतवादी संघटनेतील प्रमुख नेते हे उच्च पदावर आहेत. हक्कानी नेटवर्कचे प्रमुख आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानीला गृहमंत्री पद देण्यात आलंय. त्याशिवाय तालिबानचा संस्थापक असलेला मुल्ला उमर याच्या मुलगा याकूब याची रक्षामंत्री पदी नियुक्ती करण्यात आलीये. मोठ्या दहशतवाद्यांना अशा उच्च पदांवर पाहून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.


सरकार स्थापनेवर चीनचं लक्ष


'आम्ही सरकार स्थापनेवर लक्ष ठेवून आहोत. 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळानंतर अफगाणिस्तानमधील अराजकता संपुष्टात आणली आहे. तसेच अफगाणिस्तानसाठी देशांतर्गत सुव्यवस्था आणि युद्धानंतरच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक पावले उचलली आहेत. "सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था लवकरात लवकर पुनर्संचयित करण्यासाठी अंतरिम सरकार स्थापन केले आहे", असं अफगाण तालिबानने स्पष्ट केलं", असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांनी नमूद केलं. वेनबिग यांना तालिबान सरकारबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 
 
तालिबानने सर्वसमावेशक सरकार स्थापन केलेले नाही, ना तालिबान्यांच्या सरकारमध्ये अन्य राजकीय पक्षाच्या सदस्याचा समावेश आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात महिला मंत्रीचाही समावेश नाही. तालिबानने सर्वसमावेशक सरकार बनवावे, असे सांगत वांग यांनी चीनच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.


वांग वेनबिग काय म्हणाले?  
 
"अफगाणिस्तान सर्व दहशतवादी शक्तींचा ठामपणे सामना करतील, तसेच इतर देशांशी, विशेषत: त्याच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करतील", असा आशावाद वांग वेनबिग यांनी व्यक्त केला.