वॉशिंग्टन : चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना व्हायरसचं संकट  दूर होत नाही, त्यात अमेरिकेत एका नव्या आजाराने डोकंवर काढलं आहे. त्यामुळे अमेरिकेत सध्या सर्वत्र चिंताजनक असं वातावरण निर्माण झालं आहे. या नवीन आजारामुळे ६०० पेक्षा जास्त नागरिक आजारी पडले आहेत. सांगायचं झाल तर हा आजार हवाबंद सॅलडच्या पाकिटातून पसरला आहे. त्यामुळे अमेरिकेतील सर्व हॉटेल्समध्ये  सॅलड बंदी करण्यात आली आहे. सायक्लोस्पोरियासिस सूक्ष्म परजीवींशी संबंधित आजार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आजाराची सुरूवात मे महिन्यात झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान जुलै महिन्यात या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. जॉर्जिया, आयोवा, इलिनोइस, मिनेसोटा, पेन्सिल्वियासह ११ राज्यांमध्ये हा आजाराचा संसर्ग झाला आहे. 


एका हवाबंद सॅलड पाकिटामध्ये आइसबर्ग लेटस, गोभी आणि गाजर असतात. याच सॅलडच्या पकिटात सायक्लोस्पोरियासिस हा परजीवी विषाणू आढळला आहे. फ्रेश एक्स्प्रेस या कंपनीने ही सॅलडची पाकिटे बाजार आणली होती. प्रशासनाकडून आता या पाकिटांची तपासणी सुरू आहे. 


आजाराची लक्षणं 
-  भूक लागत नाही
-  पोट फुगणे, मळमळ, सौम्य ताप, थकवा आणि अतिसार अशी या आजाराची लक्षणे आहेत.