वॉशिंग्टन : बिल गेट्स (Bill Gates) आणि मेलिंडा गेट्स (Melinda Gates) यांनी आपण वेगळे होत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे घटस्फोटानंतर मिळालेल्या कोट्यवधी डॉलर्सची संपत्ती मेलिंडा कोठे खर्च करणार? याविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंत बिल आणि मेलिंडा हे जगातील सर्वात श्रीमंत आणि परोपकारी दाम्पत्य होते. घटस्फोटानंतरही हे दोघे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत राहतील. मेलिंडा गेट्स यांनी अनेक वर्ष लोकांसाठी चांगले कार्य केले आहे, ज्यामुळे त्यांची एक परोपकारी रोल मॉडेल म्हणून ओळख निर्माण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएनएन बिझिनेसशी बोलताना मेरियन वेंचर्सचे संस्थापक आणि मॅनेजिंग पार्टनर एलेक्सिस डी राड्ट सेंट जेम्स म्हणाले, "लोकांच्या जीवनात सुधारणा करण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल मला शंका नाही." यापूर्वी मेलिंडाने लोकांसाठी केलेले कार्ये पाहिले तर, येत्या दशकात तिच्याकडून बर्‍याच अपेक्षा केल्या जात आहेत. काही अशा क्षेत्रांची नावे सोमोर आली आहेत की, ज्यामध्ये मेलिंडा तिचे पैसे खर्च करु शकते.


महिला सशक्तीकरण


स्वत: मेलिंडाच्या म्हणण्यानुसार महिला आणि मुलींच्या जीवनात असमानता आहे. यासाठी त्यांनी 2015 मध्ये ‘पायवोटल वेंचर्स’ नावाची कंपनी सुरू केली. एका मीडिया अहवालानुसार या कंपन्या महिलांच्या आयुष्यातील समस्यांवर लक्ष केंद्रित करतात आणि विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवतात.


मेलिंडा महिलांना गर्भनिरोधक गोळ्यांची माहिती देत आहे आणि त्यांना त्यांच्या अधिकाराबद्दलही समजावत आहे. कारण यामुळे महिलांना केवळ त्यांच्या शरीरीक अधिकारा बद्दलच नाही, तर जगातील गरिबी संपवण्याचे हे एक शस्त्र आहे हे देखील समजावत आहे. अशा परिस्थितीत, असे मानले जाते की, मेलिंडा आता महिला सशक्तिकरणवर अधिक लक्ष देईल.


मानसिक आरोग्य


मेलिंडा गेट्सने अनेक मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले आहेत. तिचा 'साउंड इट आउट' आणि तिच्या मागील वर्षाच्या 'अप्सव्हिंग फंड फॉर अ‍ॅडॉल्संट मेंटल हेल्थ' मधिल तिचा सहभाग पाहून असे दिसते की, येत्या काही दिवसात ती या विषयावर लक्ष केंद्रित करेल.


कोविड -19  लसीकरण


मेलिंडा गेट्स यांनी बर्‍याचदा सांगितले की, लस ही प्रत्येकासाठी किती महत्वाची आहे. सीएनएनशी झालेल्या संभाषणात ती म्हणाली की, "सध्याची परिस्थिती पाहाता प्रत्येकालाच लसीची गरज आहे. जर आपण ते फक्त श्रीमंत देशांनाच दिले तरी हा आजार सर्वत्र पसरु शकतो.


ज्यामुळे सर्वच देशातील मृत्यूंची संख्या डबल होईल. आपली अर्थव्यवस्था सुधारण्याची गतीही खूप कमी होईल." त्यामुळे आता मेलिंडा आपल्या पैशातून लोकांना लस देण्याच्या दिशेने काम करेल अशी अपेक्षा आहे.