Lockdown मध्ये Work From Home तर Unlock मध्ये Work From Pub काही ठिकाणी या संकल्पनेनुसार कर्मचारी वर्ग काम करताना दिसत आहेत. कोरोनामुळे अनेकांच्या भविष्यावर फरक पडला. कोरोनानंतर अनेकांचे काम करण्याचे स्वरुप बदलले पाहायला मिळाले. कोरोनाच्या काळात लोकांना ऑफिसऐवजी घरूनच काम करावे लागले आणि अजूनही अनेक कार्यालयांमध्ये घरून काम सुरू आहे. पण ब्रिटनमध्ये अनेक बार आता कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम पब ऑफर करत आहेत. ब्रिटीश पब ऑपरेटर आता "वर्क फ्रॉम पब" (WFP) नावाची नवीन सेवा सुरू करत आहेत. दिवसानुसार ऑफर ही दिली जात आहे. अनेक पब पेये देखील देत आहेत, जे पॅकेजसह उपलब्ध असतील. (After Work From Home now Work From Pub will start great offers for employees nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द गार्डियन मधील एका अहवालानुसार, "लॅपटॉप वर काम करणारे कर्मचारी त्यांच्या घरातील वीज बिल कमी करण्यासाठी असे करतील या आशेने, वाढत्या संख्येने पब आता त्यांचे महसूल वाढवण्यासाठी WFP पॅकेजची ऑफर देत आहेत. 'वर्क फ्रॉम पब' ऑफर सुमारे 900 रुपयांपासून सुरू होते. एका व्यक्तीला एका दिवसात 900 रुपये खर्च करून दुपारचे जेवण, पेय मिळेल.


त्याच वेळी, ब्रुअरी यंगच्या 185 पबने 1400 रुपयांमध्ये वर्क फ्रॉम पब (WFP) डील ठेवली आहे. त्यांच्या किमती वेगवेगळ्या पबमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात. ब्रुअरी यंगच्या डीलमध्ये सँडविच लंच, चहा आणि कॉफी उपलब्ध असेल.


आणखी वाचा - पाकिस्तानात आहे 5000 वर्ष जुने हिंदू मंदिर...जाणून घ्या इतिहास


 


 


'गार्डियन'शी केलेल्या संभाषणात, 'वर्क फ्रॉम पब' च्या संचालकाने सांगितले की, 900 रुपये खर्च करून तुम्हाला सँडविच, टेबल प्लग आणि अमर्यादित चहा-कॉफी मिळते. त्याने या कल्पनेचे कौतुक केले आणि म्हणाले – फोकस करून पबमध्ये काम करणे सोपे आहे. कारण इथे तुम्ही निवांत काम करु शकता.


ब्रिटनमध्ये राहण्याचा खर्च सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत बार (BAR) WFP (Work From Pub) च्या माध्यमातून लॅपटॉपवर काम करणारे लोक येथे येतील अशी अपेक्षा आहे. यामुळेच अनेक पब यासाठी अनेक प्रकारच्या ऑफर्सही देत आहेत. पब्सनाही आशा आहे की या ऑफरमुळे त्यांना उत्पन्न मिळेल आणि ब्रिटिशांना वीज बिलातूनही दिलासा मिळेल. कारण अलीकडेच ब्रिटनमध्ये वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा फटका लोकांना बसला आहे.


आणखी वाचा - या अभिनेत्रीने घेतली 'इतकी' महागडी पर्स, किंमत ऐकून बसेल धक्का