मुंबई : आजच्या काळात संपूर्ण जग डिजिटल झाले आहे. कोणत्याही व्यक्तीकडे मोबाईल किंवा इंटरनेट नसेल, असं तर शक्य नाही. त्यात आता कोरोनानंतर तर ऑनलाईन शिक्षणासाठी अगदी लहान मुलांच्या हातात देखील फोन आहे. त्यात स्मार्टफोन म्हटलं की, इंटरनेट हा आलाच, कारण इंटरनेट शिवाय स्मार्टफोन हे फोन उचलणे आणि ठेवणे या व्यतिरिक्त काहीही कामाचे नाही. जगातील बहुतेक देश इंटरनेट वापरतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगात एक शहर असेही आहे. जिथे इंटरनेट, स्मार्टफोन, टीव्ही आणि रिमोटवर चालणारी उपकरणं वापरली जात नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला आश्चर्य वाटत असलं, तरी हे खरं आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे शहर तुम्हाला ना उत्तर कोरियामध्ये सापडेल आणि ना चीनमध्ये, कारण हे शहर अमेरिकेत आहे. काही बातम्यांनुसार हे शहर ग्रीन बँक सिटी म्हणून ओळखले जाते.


या शहरात 150 हून अधिक लोक राहातात. एवढेच नाही तर या शहरात जर तुम्ही वायफाय किंवा इंटरनेट वापरत असल्याचे आढळले, तर तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.


परंतु हे ऐकून तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, या शहरात इंटरनेट आणि स्मार्टफोन का वापरले जात नाही?


खरंतर जगातील सर्वात मोठी स्टीरेबल रेडिओ टेलिस्कोप या शहरात सापडली आहे. या दुर्बिणीला ग्रीनबँक टेलिस्कोप असेही म्हणतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, दुर्बिणीच्या मदतीने शास्त्रज्ञांना अवकाशाविषयी माहिती मिळू शकते. यासोबतच पृथ्वीवरून सिग्नलही पाठवला जातो, ज्यामुळे तिथून कोणतीही माहिती मिळू शकते.


यासोबतच दुर्बिणीद्वारे १३ अब्ज प्रकाशवर्षे दूरचा आवाजही पकडला जाऊ शकतो हे आश्चर्यकारक आहे.


त्यामुळेच या शहरात इंटरनेट आणि वायफाय वापरण्यास बंदी आहे, कारण याच्या वापरामुळे संशोधनात गडबड होऊ शकते. या सगळ्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांना इंटरनेटशी संबंधित अनेक गोष्टींची माहितीच नसते. इथे राहणारी मुलंही सोशल मीडियापासून दूर आहेत.