मुंबई : रंग बदलणारा प्राणी असं नाव घेतलं की आपल्याला आठवतो तो सरडा. बऱ्याचदा लोकं संभाषणात देखील सरडा आणि त्याच्या रंग बदलण्यावर बोलतो. जसे की आपण लोकांना बोलताना पाहिलं असेल की, तो व्यक्ती सरड्या प्रमाणे आहे. जो रंग बदलतो, त्याच्यापासून लांब राहा. परंतु तुम्हाला माहितीय का की, मासा देखील सरड्याप्रमाणे रंग बदलतो? हो हे खरं आहे, या माशाचं नाव Lumpfish आहे. हा मासा अटलांटिक आणि आर्क्टिक महासागराच्या खोलात आढळतो. परंतु अनेक रंगांमध्ये आढळणाऱ्या या माशाचा रंग वयानुसार बदलतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रंग बदलून चमकणाऱ्या या माशाबाबत जर्नल ऑफ फिश बायोलॉजीमध्ये नुकताच एक संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे.


बहुतेक माशांची त्वचा गुळगुळीत असते, परंतु या माशाचे शरीर खडबडीत असते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, त्यांना या माशाचा खरा रंग त्यांना आता कळला आहे, त्यांचा दावा आहे की, लंपफिशचा खरा रंग फ्लोरोसेंट हिरवा आहे.


एका संशोधनानुसार, लंपफिश एकमेकांना ओळखण्यासाठी, बोलण्यासाठी आणि शिकार आकर्षित करण्यासाठी त्यांच्या बायोफ्लोरोसंट चमक वापरतात. या संशोधनात असे समोर आले आहे की, हे मासे सामान्य प्रकाशात हिरवे दिसतात, तर जेव्हा ते अतिनील प्रकाशात दिसले, तेव्हा त्यांच्या शरीरावर निऑन-हिरव्या रंगाची चमक दिसली.


जेव्हा लंपफिश तरुण असतात तेव्हा ते इंद्रधनुष्याच्या सात रंगांपैकी कोणतेही असू शकतात. पौगंडावस्थेत आजूबाजूच्या वातावरणानुसार त्यांचा रंग बदलतो. असे केल्याने, ती भक्षकांपासून लपते. वीण आणि प्रजनन काळात नर लंपफिश केशरी-लाल आणि मादी लंपफिश निळ्या-हिरव्या होतात. तर लंपफिश प्रौढ झाल्यावर हलका-तपकिरी ते हलका-निळा होतात.


एकटेपणासाठी, हे मासे त्यांचा बहुतेक वेळ समुद्राच्या तळावर घालवतात. हे मासे दिसायला विचित्र असतात. त्यांच्या ओटीपोटाच्या पंखांमुळे ते खडक आणि समुद्री शैवाल यांना चिकटून राहतात. त्यांचे पंख सक्शन कपसारखे काम करतात.