Mysterious village : जगातील असं ठिकाण जिथे चालता-बोलता झोपतात व्यक्ती
इथले लोक अनेकदा झोपलेले दिसायचे. या कारणास्तव, या लोकांवर अनेक संशोधन देखील केले गेले आहेत.
मुंबई : जगात अनेक विचित्र ठिकाणे आहेत, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा, त्यावर तुमचा सहजासहजी विश्वास बसणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गावाविषयी सांगणार आहोत, जिथे लोक कधीही झोपतात. हो तुम्ही बरोबर ऐकलंत, येथे लोक कधीही झोपतात. येथे राहणारे लोक अनेक महिने झोपत असतात. ते ही कधीही. हे ऐकायला विचित्र वाटेल पण हे अगदी खरे आहे. चला या गावाबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
या विचित्र गावाचे नाव आहे कलाची. हे गाव कझाकिस्तानमध्ये आहे. या गावातील लोक अनेक महिने झोपत असतात. त्यामुळे या गावाला स्लीपी होलो व्हिलेज असेही म्हणतात.
इथले लोक अनेकदा झोपलेले दिसायचे. या कारणास्तव, या लोकांवर अनेक संशोधन देखील केले गेले आहेत.
2010 मध्ये याचा शोध लागला
या गावात अचानक लोक झोपण्याचे पहिले प्रकरण 2010 साली उघडकीस आले होते. काही मुले अचानक शाळेत झोपू लागली. हळूहळू संपूर्ण गावातील लोक बसल्या बसल्या झोपू लागले. ऐवढेच काय तर अनेक लोक चालताना किंवा काही काम करत असताना झोपू लागले, ज्यामुळे त्याचं हे वागणं विचित्र वाटू लागलं.
तेव्हापासून येथे अनेक शास्त्रज्ञ संशोधन करू लागले. पण सर्व प्रयत्न करूनही शास्त्रज्ञांना हे रहस्य पूर्णपणे उकलता आले नाही. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, हा एक प्रकारचा आजार होता, जो नंतर 2015 मध्ये अचानक संपला.
याचे कारण शास्त्रज्ञ सांगतात
कलाची गावात युरेनियमचा विषारी वायू बाहेर पडतो, ज्यामुळे येथील लोक अचानक झोपू लागतात. येथील पाणीही विषारी वायूमुळे दूषित झाले आहे. त्याचबरोबर इथल्या पाण्यात कार्बन मोनोऑक्साइड वायू असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात, त्यामुळे इथले लोक महिनोन्महिने झोपतात.