36 वर्षीय मुलगा आणि 82 वर्षीय महिलेचं जुळलं प्रेम, खासगी आयुष्यामुळे जोडी जगभरात चर्चेत
हे दोघेही यापूर्वी देखील टीव्ही शोमध्ये दिसले आहेत.
मुंबई : ब्रिटनमधील एक जोडपं सध्या जगभरात चर्चेत आहे. वास्तविक या जोडप्याच्या वयात ४५ वर्षांचा फरक आहे. या जोडीमध्ये मुलाचं वय 36 वर्षे आहे, तर वधू 82 वर्षाची आहे, ज्यामुळेच या दोघांमधील नात्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. हे विवाहित जोडपे हे यूकेचे आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच हे जोडपे टीव्ही स्टुडिओमध्ये मुलाखत देण्यासाठी एकत्र आले होते. येथे त्यांनी आपल्या सेक्स लाईफबाबत देखील अनेक धक्कादायक खुलासे केले.
इजिप्तमधील रहिवासी असलेल्या 36 वर्षीय मोहम्मदने 82 वर्षीय आयरिससोबत लग्न केले. जेव्हा हे जोडपे एकत्र टीव्ही स्टुडिओमध्ये पोहोचले तेव्हा दोघांनी त्यांच्या वयातील अंतर आणि लैंगिक जीवनाबद्दल अनेक मजेदार खुलासे केले. तिच्या सेक्स लाईफबद्दल आयरिस सांगते की, ती मोहम्मदसोबत खूप खूश आहे.
हे दोघेही यापूर्वी देखील टीव्ही शोमध्ये दिसले आहेत, परंतु पूर्वी व्हिसाच्या समस्येमुळे त्या दोघांपैकी कोणीतरी एकटंच यायचे परंतु गेल्या महिन्यातच मोहम्मद इजिप्तहून पत्नीसोबत राहण्यासाठी आला आहे.
36 वर्षाच्या मुलाचं 82 वर्षाच्या महिलेशी लग्न
82 वर्षांच्या आयरिसला भरपूर पेन्शन मिळते. यामुळे लोक मोहम्मदच्या प्रेमावर शंका घेत आहेत. दोघांच्या वयात ४५ वर्षांचा फरक आहे. या दोन्ही जोडप्यांना वयाच्या या अंतरामुळे अनेक लोकांच्या टीकेला सामोरं जावे लागले आहे. या टीकेवर मोहम्मद म्हणतो की, आयरीससोबत भेट झाल्यानंतर त्याला आकाशात उडल्यासारखे वाटत होते.
त्याने सांगितले की, गेल्या महिन्यात जेव्हा मला समजले की, मी आयरिसला भेटायला इथे येत आहे, तेव्हा मी रस्त्यावर जोरात ओरडू लागलो. काही लोकांना तेव्हा मी मला वेडा वाटलो असेन. पण कोणालाच माझा हा आनंद समजणार नाही. शेवटी माझ्या पत्नीला भेटणार होतो, ज्यामुळे हा आनंद मला झाला होता.
मोहम्मद ब्रिटनला पोहोचल्यावर विमानतळावरच दोघांनी एकमेकांना मिठी मारली. यावर 82 वर्षीय आयरिस म्हणते की, तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता.
मोहम्मद म्हणतो की, जेव्हा लोक त्याच्या प्रेम आणि रोमान्सवर प्रश्न करतात तेव्हा त्याला खूप दडपण येते. लोक म्हणतात की मी पैशांसाठी आयरिससोबत आहे. परंतु लोकांना मी सांगु इच्छीतो की, माझ्याकडे कशाचीही कमतरता नाही, परंतु मला याबद्दल कोणालाही काही सांगू इच्छीत नाही, असे मोहम्मद म्हणाला. मी एमबीए केले आहे, मला चांगले पैसे मिळत आहेत. मी एक श्रीमंत व्यक्ती आहे आणि माझा कैरोमध्ये एक बंगला आहे. त्यामुळे मी पैशासाठी आयरिससोबत नाही.
'एकमेकांशिवाय जगणं अवघड'
दुसरीकडे, मोहम्मदसोबत पहिल्यांदाच मुलाखतीसाठी आलेली आयरीस खूप आनंदी दिसत होती. यापूर्वी दोघे फक्त फोनवरच बोलू शकत होते. मोहम्मदने मुलाखतीदरम्यान सांगितले की, लॉकडाऊन आणि व्हिसा न मिळाल्यामुळे दोघांना भेटण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
आम्हाला दूर राहणे कठीण झाले होते. फोनवर बोलणं आणि गुड नाईट म्हणणं आता कंटाळवाणं होतं. आयरिस म्हणते की, ती नेहमीच या दिवसाची वाट पाहत होती. आता ती खूप खुश आहे.