बाहुल्यासोबत लग्न केलेल्या महिलेनं बाळाला दिला जन्म, मुलाचा फोटो पाहून बसेल धक्का
एका बाहुल्यापासून महिलेला कसं काय मुल होऊ शकतं? आणि हे बाळ कसं दिसतं? जे जाणून घेण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे.
मुंबई : हल्लीच एका तरुणीने स्वत:सोबत लग्न केल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. त्यात आता आणखी एका बातमीने लोकांना धक्का बसला आहे. ज्यामध्ये एका महिलेने बाहुल्यासोबत लग्न केलं आहे. होय या महिलेनं चक्क बाहुल्यासोबत लग्न करुन त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
परंतु हे तर काहीच नाही. या महिलेनं पुढे हे देखील सांगितलं आहे की, तिला या बाहुल्यापासून बाळ झालं आहे आणि त्याचा देखील फोटो या महिलेनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे लोकांना 440 वोल्टचा झटका बसला आहे.
एका बाहुल्यापासून महिलेला कसं काय मुल होऊ शकतं? आणि हे बाळ कसं दिसतं? जे जाणून घेण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुक्ता वाढली आहे आणि तुमची देखील उत्सुकता वाढली असेल.
मॅरिव्होन रोचा मोरेस नावाची एक महिला म्हणते की जेव्हा ती मार्सेलो (बाहुल्याला) भेटली तेव्हा तिला पहिल्याच नजरेत प्रेम झालं. मेरिव्हॉनने सांगितले की, मार्सेलो नावाचे हे खेळणे तिच्या आईने बनवले होते.
खरंतर मी एकटी आहे, माझ्यासोबत कोणी नाचत नाही, खेळत नाही. अशी तक्रार ती अनेकदा मेरिवॉनने तिच्या आईकडे केली होती, तेव्हा मेरिवॉनच्या आईने तिच्यासाठी एक बाहुला बनवली.
मेरिव्होनने सांगितले की ती मार्सेलो भेटल्या दिवसापासून ते दोघेही प्रेमसंबंधात आहेत. 250 पाहुण्यांनी हजेरी लावलेल्या एका सुंदर सोहळ्यात या जोडप्याचे लग्न झाले.
मीडियाशी बोलताना मेरिव्होन आईबद्दल म्हणाली, "माझ्याकडे फोरो डान्सर नसल्याने हे घडले. मी जेव्हा नाचायला जायचो तेव्हा मला नेहमी जोडीदार शोधायला लागाचं. त्यानंतर तो (मार्से) माझ्या आयुष्यात आला आणि मग मला समजले की हाच माझा जोडीदार आहे."
मेरिव्होन मार्सेबद्दल सांगताना पुढे म्हणाली, ''माझ्यासाठी तो एक अद्भुत दिवस होता, खूप महत्त्वाचा, खूप भावनिक होता. माझ्या आयुष्यात मला नेहमीच हवी असलेली ती व्यक्ती मार्से आहे. त्याच्यासोबतचे वैवाहिक जीवन खूप छान आहे. तो माझ्याशी भांडत नाही, तो वाद घालत नाही आणि तो फक्त मला समजून घेतो. मार्सेलो एक महान आणि विश्वासू पती आहे. तो असा पुरुष आहे आणि सर्व स्त्रिया त्याचा हेवा करतात.''