Ajab Gajab: दिवसा दुप्पट, रात्री चौपट कमाई... भिकारी भीक मागायला मर्सिडीज कार मधून येतात
Ajab Gajab: लंडनमध्ये अनेकांचा भीक मागणे हा व्यवसाय आहे. परिस्थितीचे हतबलतचे खोटे भाव चेहऱ्यावर आणून हे भिकारी लोकांना मूर्ख बनवतात आणि बक्कळ कमाई करतात. दिवस रात्र हे भिकारी भीक मागण्याचे काम करतात. हे भिकारी दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट कमाई करतात.
Beggars In The World : परस्थितीपुढे माणुस हताश होतो, हकतबल होतो. अनेकांवर भिक मागायची वेळ येते. आर्थिक स्थितीमुळे हताश झालेल्या या गरीब चेहऱ्यांकडे पाहून अनेकांच्या मनात दयेची भावना निर्माण होते. अनेक जण या भिकाऱ्यांना भरभरुन दान करतात. मात्र, अनेक भिकाऱ्यांचा भीक मागने हा व्यवसाय आहे. भारतात भिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक असे म्हंटले जाते. मात्र, जगातील सर्वात श्रीमंत लंडनमध्ये आहेत. येथील भिकारी दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट कमाई करतात. येथील भिकारी भीक मागायला मर्सिडीज कार मधून येतात.
जगात असे अनेक लोक आहेत जे भिक मागून आपले पोट भरतात. शारिरीक व्यंगामुळे अनेकांना श्रमजीवी काम करने शक्य होत नाही. तसेच अनेकांना चालता फिरता येत नाहीत. असे लोक एका जागी बसून भिक मागतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, अनेक जण असे आहेत ज्याचे हात पाय धडधाकट असून देखील अंगमेहनत करावी लागू नये यासाठी भिक मागतात.
भिक मागणे हे प्रोफेशन
लंडनमध्ये अनेकांचा भीक मागणे हा व्यवसाय आहे. परिस्थितीचे हतबलतचे खोटे भाव चेहऱ्यावर आणून हे भिकारी लोकांना मूर्ख बनवतात आणि बक्कळ कमाई करतात. दिवस रात्र हे भिकारी भीक मागण्याचे काम करतात. हे भिकारी दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट कमाई करतात.
अलिशान बंगल्यात राहतात
दिवस रात्र भीक मागून या भिकाऱ्यांनी कोट्यावधींची कमाई केली आहे. हे भिकारी मर्सिडीज सारख्या अलिशान कार मधून भीक मागायला येतात. तसेच हे भिकारी अलिशान बंगल्यांमध्ये राहतात. लंडनच्या रस्त्यावर भीक मागणारे हे भिकारी सध्या चांगलेच चर्चेत आहेत. माय लंडन आणि डेली स्टार या स्थानिक वृत्त संस्थेने या भिकाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
खास मेकअप आणि पेहराव तसेच उत्तम अभिनय
भीक मागण्याचा व्यवसाय करणारे हे भिकारी खूपच मेहनत घेतात. लोकांना आपल्या परिस्थितीवर दया यासाठी हे भिकारी खास मेकअप आणि स्पशेल पेहराव करतात. तसेच यांच्याकडे आणखी एक उत्तम गुण असतो तो म्हणजे उत्तम अभियन. अभिनयाच्या जोरावरच हे भिकारी भरमसाठ कमाई करतात. या भिकाऱ्यांचे खरे वास्तव समोर आल्यावर आता या भिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.