काबूल : जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल-जवाहिरीने कर्नाटकमधील मुस्कान नावाच्या मुलीचं कौतुक केलं आहे. मुस्कान ही हिजाब वाद प्रकरणात चर्चेत आली. गळ्यात भगवा फटका घातलेले तरुण जेव्हा, 'जय श्रीराम' म्हणत होते, त्यांच्याकडे फिरुन पाहाताना मुस्कानने तिने 'अल्ला हू अकबर' म्हटलं होतं, यानंतर हा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यानंतर हा व्हीडिओ अलकायदापर्यंत पोहोचला आहे, त्यावर अलकायदाची ही प्रतिक्रिया आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुस्कान अल कायदाला आता कोणत्या भाषेत उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.कारण मुस्कानने नंतर यावर मवाळ भूमिका घेतली होती.


अलकायदा प्रमुखाने मुस्कानचं कौतुक करताना म्हटलं आहे, तू हिंदू भारताची वास्तविकता आणि त्याच्या मूर्तीपूजक लोकशाहीला उघड केलंय.


अलकायदाचा हा व्हीडिओ पावणे नऊ मिनिटांचा आहे.मुस्कानचं कौतुक करताना म्हटलंय, भारताची इमानदार महिला, अलजवाहीरी व्हीडिओत पुढे म्हणतोय, पश्चिमच्या तालावर आंधळे झालेल्या लोकांना धडा शिकवण्यासाठी अल्लाहने तुला पुरस्कृत करावं.


अलजवाहीरी एवढ्यावरच थांबलेला नाही, तो आणखी पुढे म्हणतोय, हे धोक्याचं तेचं हत्यार आहे, जे फ्रान्स, हॉलंड, स्वित्झर्लंडमध्ये पाहायला मिळालं, जेथे नग्नताला मान्यता आहे, पण हिजाबवर बंदी लावण्यात आली आहे.


अल कायदाच्या अल शबाब मीडियाकडून हा व्हीडिओ रिलीज करण्यात आला, काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं की, अल जवाहीर हा आजारी आहे. तसेच एका गंभीर आजाराने त्याचा मृत्यू झाला आहे अशा अफवा २००० पासून होत्या. पण या व्हीडिओवरुन तो जिवंत असल्याचं स्पष्ट झाल्याचं सांगण्यात येत आहे.