पृथ्वीवरच अंडरग्राऊड झालेत Alien; UFO आणि एलियनच्या अस्तित्वाबाबतचा आजर्पंयतचा सर्वात मोठा दावा
एलियनच्या अस्तित्वाबाबतचा आजर्पंयतचा सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चपेपरमध्ये नवे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.
Aliens might be living with Humans : खरंच जगात एलियन्स आहेत का? एलियन्स असतील तर ते कुठं राहतात? एलियन्स नेमके येतात तरी कुठून...? असा अनेक प्रश्नांचा अद्याप उलगडा झालेला नाही. एलियन हे परग्रहावर राहत असल्याचा दावा नेहमीच केला जातो. मात्र, एलियन परग्रहवार नाही तर पृथ्वीवरच अंडरग्राऊड लपून राहतात. नविन संशोधनात UFO आणि एलियनच्या अस्तित्वाबाबतचा आजर्पंयतचा सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे.
परग्रहावरील एलियन आणि उडत्या तबकड्या अर्थात UFO यांची नेहमीच चर्चा सुरू असते. परग्रहावर वास्तव्य करणारे सजीव पृथ्वीवर येत असल्याचा दावा अनेक जण करतात. अनेकांनी उडत्या तबकड्या पाहिल्याचा दावाही केलाय. पण याचे भक्कम पुरावे कुणीही देऊ शकला नाही. मात्र, हे UFO च एलियनपर्यंत पोहचणार आहेत.
परग्रहावर नाही तर पृथ्वीवरच राहतात एलियन
हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या ह्युमन फ्लोरिशिंग प्रोग्रामने एक अहवाल सादर केला आहे. यात UFO आणि एलियनच्या अस्तित्वाबाबत खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या सादर केलेल्या रिसर्च पेपरमध्ये एलिय हे परग्रहावर नाही तर पृथ्वीवरच मानवासोबत छुप्या पद्धतीने राहत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
एलियन आणि UFO यांचे कनेक्शन काय?
जगभरात अनेक ठिकाणी अनेकांनी अनेकदा UFO दिसल्याचा दावा केला आहे. मात्र, हे UFO अचानक गायब होतात. मात्र, ज्या ठिकाणी हे UFO दिसले त्या ठिकाणीच एलियन्सचा बेसकॅम्प असू शकतो असं संशोधकांचे म्हणणे आहे. बहुतांश UFO हे समुद्र किनाऱ्यांवर दिसले आहेत. जिथे UFO दिसले त्यांचे लोकेशन पाहिल्यास 80 टक्के लोकेशन हे समुद्राच्या आसापास दिसले आहेत.
पृथ्वीवरच लपून राहतात एलियन?
पृथ्वीवर मानवासोबत खोल समुद्रात एलियन लपून राहत असल्याचा दावा हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्च पेपरमध्ये करण्यात आला आहे. रिसर्चपेपरमध्ये एलियनचा उल्लेख क्रिप्टोटेरेस्ट्रियल असा करण्यात आला आहे. याचा अर्थ असा होतो की असा काल्पनिक प्राणी, जे मानवांमध्ये राहतात, परंतु त्यांच्याबद्दल कोणालाही माहिती नाही. जपानच्या अटलांटिसमधील 5,000 वर्ष जुन्या पिरॅमिडचे अवशेष आढळले. पृथ्वीच्या खाली बरेच गूढ आहेत. यामुळे पृथ्वीच्या भूर्गभात दुसरी प्रजाती असू शकते जी आपल्यासारखीच असू शकते असा दावा संशोधकांनी केला आहे.