Amazing Science Research: 'ममी' म्हटलं की डोळ्यासमोर ईजिप्त हा देश येतो. मोठमोठे पिरामिड्स आणि त्यामध्ये असलेल्या ममीचं कायमच कुतुहूल असतं. 'ममी' जिवंत होतील? असा त्यावेळेचा समाजाला समज असावा, असं बोललं जातं. इतकी वर्षे मृतदेहांचा जतन कसं केलं असेल? असा प्रश्नही प्रत्येकाला पडतो. आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. संशोधन करत अनेक शास्त्रज्ञांनी गुढ रहस्यांची उकल केली आहे. परंतु आजही शास्त्रज्ञ माणसाला जिवंत करण्याचे तंत्र शोधू शकलेले नाहीत. मात्र, एका ऑस्ट्रेलियन कंपनीने या दिशेने खूप जवळ असल्याचा दावा केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, भविष्यात मानव देखील जिवंत होऊ शकतो. या दाव्याची वस्तुस्थिती काय आहे आणि ते कसे शक्य होईल? ते जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीराला -200 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवले जाईल


डेली मेलच्या वृत्तानुसार, हे संशोधन ऑस्ट्रेलियाच्या सदर्न क्रायोनिक्स कंपनीने केला आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय सिडनी येथे आहे. सदर्न क्रायोनिक्सचे म्हणणे आहे की, त्यांनी हॉलब्रुकमध्ये एक तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामध्ये मृत माणसाचे प्रेत -200 डिग्री सेल्सियस तापमानात एका बॉक्समध्ये ठेवले जाईल. यात ते ज्या स्थितीत ठेवले होते त्याच स्थितीत राहील. भविष्यात मानवाला जिवंत करण्याचे कोणतेही तंत्रज्ञान विकसित झालं, तर प्रेत पेटीतून बाहेर काढून त्यांना नवीन जीवन दिले जाईल, असा कंपनीचा दावा आहे.


कंपनीच्या म्हणण्यानुसार, या सुविधेसाठी ग्राहकांकडून 1 कोटींहून अधिक शुल्क आकारले जाईल. कंपनी मानवी प्रेत -200 डिग्री सेल्सिअस तापमानात द्रव नायट्रोजनमध्ये स्टील चेंबरमध्ये वरच्या बाजूला ठेवेल. मृतदेह उलटे ठेवण्याचे कारण म्हणजे चेंबर गळती झाली तरी मेंदू शाबूत राहतो.


आता 40 मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे


कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे सध्या असे 40 बॉक्स आहेत. म्हणजेच ते 40 मृतदेह ठेवू शकतात. व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, लवकरच आम्ही त्याची संख्या वाढवू आणि एक गोदाम बांधू. जिथे अशा 600 मृतदेह ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. कंपनीचा हा प्रकल्प विज्ञानात क्रायोनिक्स म्हणून ओळखला जातो.