Amazonकडून `बाटलीत लघवी` करण्याची चूक मान्य, मागितली माफी
जगातील सर्वात मोठया ई-कॉमर्स कंपनी Amazon वर गंभीर आरोप लावले गेले आहे. कंपनीनेही नंतर ते स्वीकारले आणि माफी देखाल मागितली आहे.
मुंबई : जगातील सर्वात मोठया ई-कॉमर्स कंपनी Amazon वर गंभीर आरोप लावले गेले आहे. कंपनीनेही नंतर ते स्वीकारले आणि माफी देखाल मागितली आहे. कंपनीवर असा आरोप केला गेला होता की, कंपनी आपल्या कर्मचार्यांचे शोषण करत आहे. Amazon वर असा आरोप होता की, कंपनाच्या कर्मचार्यांवर इतका कामाचा बोजा आहे की, त्यांना लघवीला जायलाही वेळ नसतो. त्यामुळे ते लघवी करण्यासाठी बाटलीचा वापरत करतात, म्हणजे बाटलीतच लघवी करत. ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कंपनीला ट्रोल केले जात होते. या प्रकरणात अमेरिकेच्या नेत्यांनीही कंपनी विरोधात बोलायला सुरवात केली. त्यानंतर Amazon ने या बद्दल माफी मागितली आहे.
अमेरिकन नेते काय म्हणाले?
अमेरिकन नेते मार्क पोकन यांनी Amazonवर निशाणा साधत ट्विट केले की, "तुमच्या कर्मचार्यांना तासाला 15 डॉलर्स देऊन तुम्ही प्रगतीशील बनत नाही. इतके काम की, आपल्या कर्मचार्यांना कामाच्या बोजामुळे बाटलीत लघवी करण्याची वेळ येते."
यावर अॅमेझॉनने एका ट्वीटद्वारे उत्तर दिले की, “तुम्ही 'बॉटलमध्ये लघवी करण्याची वेळ आली या गोष्टींवर विश्वास ठेवता आहेत ना? जर अशी परिस्थिती असेल तर कोणताही कर्मचारी आमच्यासाठी काम करणार नाही. सत्य हे आहे की, आमच्याकडे दहा लाखाहून अधिक उत्कृष्ट कामगार आहेत. ज्यांना त्यांच्या कामाचा अभिमान आहे. या लोकांना केवळ चांगला पगारच मिळत नाही तर, पहिल्या दिवसापासूनच उत्तम आरोग्य सेवा देखील मिळते."
त्यानंतर Amazon ने एका ब्लॅागद्वारे संपूर्ण गोष्टीची सविस्तर माहिती देऊन माफी मागितली.
कोरोनासाथीच्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती जबाबदार
Amazon कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, कोरोना महामारीमुळे सार्वजनिक शौचालये बंद होती आणि काही ग्रामीण भागातही मूलभूत सुविधा कमी असल्याने कर्मचार्यांना अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला. ट्रॅफिकमुळेही अशा परिस्थिती आली असावी असा अंदाज कंपनीने वर्तविला आहे.
लोकांचा असा आरोप आहे की, कंपनीचे चालक हे सुविधा नसल्यामुळे नव्हे तर, वेळेअभावी हे करत आहेत. त्यांना लघवीला जाण्यासाठीही वेळ नसतो. म्हणून त्यांच्यावर बाटलीत लघवी करण्याची वेळ आली आहे.
संपूर्ण प्रकरण काय होते?
एका अहवालानुसार, Amazon कंपनीत काम करणारे प्रत्येक डीलिव्हरी वर्कर 10 तास काम करतात. या शिफ्टमध्ये, त्यांना 300 पॅकेजेसची डीलिव्हरी करावी लागते. जर त्यांनी जास्त वेळ वाया घालवला तर, त्यांची नोकरी जाण्याचा धोका उद्भवतो.
Amazonच्या ड्रायव्हरने एका मुलाखतीत सांगितले की, "डीलिव्हरी दरम्यान जर आम्ही रस्त्यात टॅायलेट शोधू लागलो तर यात आमचे 10-20 मिनिटे वाया जातात. म्हणून मग आम्ही लघवीसाठी बाटल्या वापरतो." तसेच त्याने दावा केला की, बरेच Amazon ड्रायव्हर्स बाटल्यांमध्ये लघवी करतात आणि त्यानंतर ते आपले हात सॅनिटायझरने स्वच्छ करतात.