...आणि चालू Video मध्ये तिनं गमावली Amazon ची नोकरी ; Day In My Life शूट करताना बसला धक्का
Viral Video : असंख्य व्हिडीओ, शेकड्यानं अनुभव आणि अशा न तशा कैक गोष्टी शेअर केल्या जातात. तुम्हीही या जगतात रमता का? मग तुम्हाला ट्रेंडिंग व्हिडीओ माहितच असावेत.....
Amazon Layoff : इन्स्टा रील्स (Insta Reels) असो, युट्यूब शॉट्स असो किंवा आणखी कोणतंही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. दर दिवशी इथं असंख्य व्हिडीओ आणि त्याहूनही बहुविध विषयांवर भाष्य करणारा CONTENT व्हायरल होत असतो. अनेक युझर्स हा कंटेट शेअर, लाईक करताना दिसतात. हल्ली या वर्तुळामध्ये Day In My Life हे व्हिडीओ बरेच चर्चेत आले.
थोडक्यात सांगावं तर, तुम्ही दिवसभरात नेमकं काय करता, तुमची दिनचर्या काय असते अशा मुद्द्यांवर या व्हिडीओच्या माध्यमातून अवघ्या काही सेकंदांतच प्रकाशझोत टाकला जातो. बरेच व्लॉगर दर दिवशी हे व्हिडीओ उत्साहात शूट करताना दिसतात. अॅमेझॉनची कर्मचारी आणि एक ब्लॉगर, व्लॉगर असणाऱ्या अशाच एका महिलेनं हा व्हिडीओ शूट करण्यात सुरुवात केली. पण, झालं काही भलतंच....
तिला नोकरीवढून काढलं... कॅमेरानं टीपलं...
Jennifer Lucas असं या महिलेचं नाव असून, तिच्यासोबत घडलेला प्रकार नेटकऱ्यांच्या पोटात खड्डा करून गेला. अॅमेझॉनमध्ये recruiting manager या पदावर कार्यरत असणारी जेनिफर 'डे इन माय लाईफ' हा व्हिडीओ शूट करत होती. टीकटॉकसाठी ती हा व्हिडीओ तयार करत होती.
व्हिडीओमध्ये ती नेटकऱ्यांना झोपेतून उठताना, कॉफी बनवताना आणि त्यानंतर कामासाठी कंप्युटर सुरु करताना दिसली. तिनं मेल सुरु केला आणि पुढच्याच क्षणी, 'lAYOFF'चा मेल तिच्या नजरेसमोर आला. थोडक्यात नोकरीवरून काढल्याचा क्षण तिनं अजाणतेपणे चित्रीतही केला. (amazon employee Accidentally records her layoff video while making day in my life trending video )
हेसुद्धा वाचा : TATA हॅरियर, सफारीचे नवे मॉडेल, त्यांची किंमत, फिचर्स पाहून म्हणाल, आणि काय हवं...?
अॅमेझॉनमझून नुकतीच 9 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली. जेनिफर हे त्याच भल्यामोठ्या यादीतलं एक नाव. 2015 मध्ये तिनं या संस्थेत काम सुरु केलं. प्रचंड मेहनतीच्या बळावर ती मॅनेजर पदापर्यंत पोहोचली आणि ज्या संस्थेसाठी तिनं इतकी मेहनत घेतली तिथूनच तिला असा अनपेक्षित निरोप देण्यात आला. जेनिफरनं जीवनातील ध्येय्य गाठलं असलं तरीही एका क्षणात तिच्या आयुष्यानं मोठा वळसा घेतला होता. आता हा प्रवास तिला नेमका कोणत्या वाटेवर आणून सोडणार हे तिलाही ठाऊक नाही.
अॅमेझॉनमधील कर्मचाऱ्यांना दणका
मार्च महिन्यामध्ये अॅमेझॉनमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली. इथं, वेब सर्विस, ट्विट्च, अॅडवर्टायझिंग, एचआर अशा विभागातील कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला. ज्यामुळं अनेकांनाच चांगल्या पगाराच्या नोकरीला मुकावं लागलं होतं. जागतिक आर्थिक मंदीच्या सावटामुळं अॅमेझॉनसोबतच जगातील इतरही प्रतिष्ठीत कंपन्यांनी असे निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं.