Bank Robbery: चोराने बँक लुटण्यासाठी बूक केली कॅब, परत येताना केली अशी चूक आणि...
काही चोरीच्या घटना इतक्या विचित्र असतात की, आश्चर्याचा धक्का बसतो. अशीच चोरीची घटना समोर आली असून पोलिसही चक्रावून गेले आहेत. चोराने चोरीसाठी जबरदस्त प्लान आखला होता. बँक लुटण्यासाठी खासगी कार नेण्याऐवजी चोराने कॅब बूक केली होती.
Uber Cab Used For Bank robbery: जगभरात चोरीच्या अनेक घटना घडत असतात. काही चोरीच्या गुन्ह्याची (Robbery) उकल करताना पोलिसांना कठीण जातं. तर काही चोरीच्या घटना इतक्या विचित्र असतात की, आश्चर्याचा धक्का बसतो. अशीच चोरीची घटना समोर आली असून पोलिसही चक्रावून गेले आहेत. चोराने चोरीसाठी जबरदस्त प्लान आखला होता. बँक लुटण्यासाठी खासगी कार नेण्याऐवजी चोराने कॅब बूक केली होती. घटनास्थळी जाऊन पैसे घेतले आणि पुन्हा गाडीत बसून निघाला. पण त्यानंतर थेट पोलिसांच्या हाती लागला. ही घटना अमेरिकेतील मिशिगनमधील आहे. मिरर ऑनलाइन रिपोर्टनुसार, आपल्याला कोणी पकडू नये यासाठी चोर तयारी करुन आला होता. एखाद्या हॉलिवूड चित्रपटाप्रमाणे एकटाच घटनास्थळी गेला आणि नियोजनबद्ध पद्धतीने बँक लुटली. बँकेची मिनी ब्रँच असल्याने चोरी करण्यात यशस्वी झाला.
थेट पोलिसांकडे नेली कॅब
चोरट्याने कॅब बुक केली आणि मिशिगनच्या साउथफील्ड भागातील मिनी शाखेत जाऊन शस्त्र दाखवून पैसे लुटले. पंचनाम्यात, शस्त्राचा उल्लेख नसला तरी नोटांचे बंडल आणून ते त्याच कॅबमध्ये ठेवले. दरम्यान, कॅब चालकाला संशय आल्याने त्याने कॅब थेट पोलिसांकडे नेली आणि चोरट्याचा प्लान फसला. यानंतर चोरट्याला पोलिसांनी पकडले.
ड्रायव्हरला संशय येऊ नये म्हणून त्याने केलेली चूक महागात पडली. चोरी यशस्वी व्हावी यासाठी काही अंतरावर कॅब उभी केली होती. त्यामुळे ड्रायव्हरला त्याच्यावर संशय आला. मग काय चोर गाडीत बसल्यानंतर गाडी थेट पोलीस स्टेशनमध्येच उभी केली. सध्या अधिकाऱ्यांनी चोरट्याला पकडले असून त्याने आपला गुन्हाही कबूल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून चोरट्याची मानसिक स्थितीही तपासली जात आहे.