लादेनच्या मुलाची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १ दशलक्ष डॉलरचं बक्षीस जाहीर
लादेनचा मुलगा हामजानं घेतली ओसामाची जागा
वॉशिंग्टन : ओसामा बिन लादेनचा मुलगा अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरला आहे. ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजानं आता ओसामाची जागा घेतली आहे. हामजा आता ओसामा बिन लादेनच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कट रचतो आहे. त्याने अमेरिकेविरोधात काही दहशतवादी कारवाई करण्याआधीच तो अमेरिकेला हवा आहे. त्यामुळे त्याच्यावर १ दशलक्ष डॉलरचं बक्षीस अमेरिकेनं जाहीर केलं आहे. हामजाला जिहादींचा राजा असं म्हटलं जातं. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला अमेरिकेनं अबोटाबादमध्ये ठार केलं होतं. ओसामा बिन लादेनने अमेरिकेतल्या ट्विन टॉवरवर विमान हल्ला केला होता. ज्या घटनेत अडीच हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. यानंतर अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्याचा ठाव ठिकाणा समजताच त्याला ठार करण्यात आले. आता अमेरिकेला हाजमा हवा आहे कारण हाजमा बिन लादेन हा अल कायदासह इतर जिहादी संघटनांचा म्होरक्या झाला आहे. त्याने दहशतवाद्यांचे जाळेही उभारण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, 'हमजा बिन-लादेन अल-कायदाचा प्रमुख आणि ओसामा बिन-लादेनचा मुलगा आहे. तो अल-कायदाचा नवा नेता म्हणून पुढे येत आहे. सध्या तो पाकिस्तान-अफगाणिस्तान बॉडरजवळ आहे. पण तो इराणला जाण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे.'
अमेरिकेच्या माहितीनुसार, हमजाचं सध्या 30 वर्षांचा आहे. 2011 मध्ये आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी अमेरिकेवर हल्ल्याची तयारी केली आहे. अमेरिकेच्या नेवी सील्सने पाकिस्तानच्य़ा एबटाबादमध्ये घुसून 2011 मध्ये लादेनचा खात्मा केला होता.