America Plane Hijacking: अमेरिकेत विमान अपहरणाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अपहरकर्त्याने धमकी दिली असून पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ परिसरातील सर्व नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व नागरिकांना त्या भागापासून दूर राहण्यास सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या मिसिसिपीमध्ये (Mississippi) विमानाच्या पायलटने (Pilot) विमान धडकवण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. पायलटने 9 आसनी विमानाचं अपहरण केलं आणि तुपेलो विमानतळावरून उड्डाण केलं. यानंतर तासभर तो शहरातच विमान उडवत होता.



माहिती मिळताच पोलीस आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अनेक दुकाने रिकामी करण्यात आली. स्थानिक वेळेनुसार पहाटे ५ वाजता ही घटना घडली. वॉलमार्ट स्टोरला (Walmart) धडक देऊन विमान क्रॅश करू (Plane Crash) अशी धमकी त्या पायलटने दिली होती.


पोलीस आणि आपत्कालीन व्यवस्थापक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तुपेलो पोलिस विभागाकडून सर्व नागरिकांनी सजग आणि जागरूक राहण्याचं आवाहन केलं आहे.