America Trident Missile : जागतिक स्थरावर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी देशाच्या संरक्षामासाठी जगातील सर्वच देश आत्याधुनिक शस्त्रांची निर्मीती करत आहेत. अनेक देश बजेट सादर करतानाच शस्त्र निर्मीतीसाठी मोठी आर्थिक तरतूद करत आहेत. जगात एक असं हत्यात आहे ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये तब्बल 5500000000 आहे. हे पृथ्वीवरील सगळ्यात महागडं हत्यार आहे. जाणून घेऊया कोणत्या देशाकडे आहे. 


हे देखील वाचा... पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती; 3800000000000... संपत्तीचा आकडा वाचताना बोबडी वळेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिका, रशिया, चीन आणि भारतासह जगभरातील शक्तिशाली देश एकमेकांपेक्षा जास्त शक्तीशाली शस्त्रांची निर्मीती करत आहेत.  या शस्त्रांची किंमतही खूप जास्त आहे. जगातील सर्वात महाग शस्त्र कोणते आहे आणि त्याची किंमत काय आहे हे समजल्यावर तुम्ही शॉक व्हाल.


जगातील सर्वात महागड्या क्षेपणास्त्राचे नाव ट्रायडंट आहे. ट्रायडेंट क्षेपणास्त्र अमेरिकेकडे आहे. शस्त्रास्त्र निर्माता लॉकहीड मार्टिनने हे क्षेपणास्त्र बनवले आहे. एका ट्रायडेंट क्षेपणास्त्राची अंदाजे किंमतभारतीय चलनात ही रक्कम 5,45,81,37,300 रुपये इतकी आहे. ट्रायडेंट क्षेपणास्त्र हे पाणबुडीवरून प्रक्षेपित केलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे.  ट्रायडेंट क्षेपणास्त्र थर्मोन्यूक्लियर वॉरहेडसह सुसज्ज आहे. आण्विक-शक्तीवर चालणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्यांमधून प्रक्षेपित केले जाते. 


हे देखील वाचा... अंबानींना अर्जंट पाहिजे 255000000000 इतके कर्ज; कारण समजल्यावर डोक्यावर हात माराल


सध्या जगातील फक्त दोनच देशांकडे ट्रायडंट क्षेपणास्त्र आहे. अमेरिका आणि ब्रिटन हे दोनच देश या क्षेपणास्त्राचा वापर करतात. अमेरिकेने हे क्षेपणास्त्र अद्याप कोणत्याही देशाला विकलेले नाही. ट्रायडेंट क्षेपणास्त्रे 12 यूएस ओहायो-क्लास पाणबुड्या तसेच चार रॉयल नेव्ही व्हॅनगार्ड-क्लास पाणबुड्यांवर तैनात करण्यात आले आहे.


80 टन  वजनाचे ट्रायडेंट क्षेपणास्त्र 44 फूट लांब आहे. ट्रायडेंट D5 क्षेपणास्त्राची मारक क्षमता 12,000 किलोमीटर इतकी आहे.  ट्रायडेंट II D5 क्षेपणास्त्र प्रथम 1990 मध्ये तैनात करण्यात आले.