Ancient fossil skull : चीनमध्ये उत्खननादरम्यान 300,000 वर्ष  म्हणजेच तब्बल 3 लाख वर्ष जुनी मानवी कवटी सापडली आहे. ही अती प्रचानी कवटी पाहून वैज्ञानिक अचंबित झाले आहेत. कारण ही कवटी  आदीमानवापेक्षा जुनी आहे. यामुळे मानवाच्या उत्क्रांची रहस्य उलगडणार आहेत. 


कुठे सापडली ही 3 लाख वर्ष जुनी कवटी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 मध्ये चीनच्या हुआलॉन्गडोंग प्रांतात  उत्खननादरम्यान  इतर जीवाश्म अवशेषांसह ही कवटी सापडली होती. ही कवटी लहान मुलाची असल्याचा अंदाज बांधला जात आहे. ही कवटी 3 लाख वर्ष जुनी असल्याने याच्या पुर्वजाचा शोध घेणे कठीण आहे. ही कवटी प्रगत मानवाचा पूर्वज असलेल्या निअँडरथल किंवा डेनिसोव्हनसारखी अजिबात दिसत नाही. यामुळे ही कवटी त्यापेक्षा जुनी असून मानावाच्या उत्क्रांती दरम्यानची असावी. चायनीज  अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स (CAS) यावर अधिक संशोधन करत असून या कवटीच्या पूर्वजांचा शोध घेणे कठीण असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. 


या कवटीचे वैशिष्ट्य काय?


या कवटीमुळे मानवाच्या उत्क्रांची रहस्य उलगडण्यास मदत होवू शकते. मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करताना निअँडरथल किंवा डेनिसोव्हन यांच्या आधी एखादी शृखंला खंडित झाली असावी. त्यातील ही मानव प्रजाती असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. 


सुरुवातीच्या आधुनिक मानवांच्या कवटीत आणि या कवटीत काही साम्य आढळले आहे. हाडांची रचना पाहता हनुवटीचा आकार  लहान आहे. याची तुलना आशियातील मानवांच्या नामशेष प्रजातीशी केली जात आहे. या प्रजातीचे नाव डेनिसोव्हन्स असे आहे.  शास्त्रज्ञांनी याचे सखोल विश्लेषण केले आहे. याचा आकार पूर्व आशियातील मध्य प्लेस्टोसीन होमिनिन जीवाश्म संग्रहात कधीही नोंदवलेले नाही असे संशोधकांन विश्लेषणात म्हंटले आहे.


चीनमधील किन शू हुआंगची कबर उघडण्यास का घाबरत आहेत संशोधक? 


चीनमधील किन शू हुआंगची कबर देखील रहस्यमयी आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ किन शू हुआंगची कबर उघडण्यास घाबरत आहेत.  
किन शू हुआंग याने 221 ईसा पूर्व ते 210 ईसापूर्व राज्य केले. या थडग्याचे रक्षण सैनिक आणि घोड्यांच्या सैन्याने केले आहे. 1974 मध्ये चीनच्या शानक्सी प्रांतातील शेतकर्‍यांनी याचा शोध लावला होता. या कबरीला हात लावणाऱ्यांचा मृत्यू होतो असा दावा देखील केला जात आहे. किन शुहुआंगच्या मृत्यूच्या 100 वर्षांनंतर चिनी इतिहासकार सिमा कियान यांनी लिहिलेल्या लेखात हा दावा केला आहे.