`हे` खरचं एलियनचे मृतदेह आहेत का? DNA टेस्टचा रिपोर्ट पाहून वैज्ञानिकही चक्रावले
Aliens News : 2017 मध्ये अमेरिकेत सापडलेल्या एलियनच्या मृतदेबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या मृतदेहांचा DNA टेस्टचा रिपोर्ट समोर आला आहे.
Alien dead body : मेक्सिकोच्या संसदेत एलियन्सचे मृतदेह दाखवण्यात आले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यानंतर आता पुन्हा एकदा एलियनेच मृतदेहाबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. 2017 मध्ये अमेरिकेत सापडलेल्या एलियनेच्या मृतदेहाच्या DNA टेस्टचा रिपोर्टही समोर आला आहे. हा रिपोर्ट पाहून वैज्ञानिकही चक्रावले आहेत.
2017 मध्ये अमेरिकेत सापडले होते एलियनचे मृतदेह
2017 मध्ये, दक्षिण अमेरिकेतील एका दुर्गम भागात ममी सारखे जतन केलेले मृतदेह सापडले होते. हे मृतदेह एलियनचे असल्याचा दावा करण्यात आला होता. या ममी कागद, डिंक, धातू आणि मानवी आणि प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. रेडिओकार्बन डेटिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने याचे निरिक्षण करण्यात आले. हे मृतदेह मानवी शरीरासारखे आहेत. याची जैविक रचना मानवासारखी आहे. मात्र, ही ममी एलियनची आहे की मानवांच्या नवीन प्रजातीची आहे, हे शास्त्रज्ञ अद्याप सांगू शकत नाहीत.
सप्टेंबर 2023 मध्ये मेक्सिकन संसदेत सादर करण्यात आलेल्या एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आजपर्यंत एलियन असल्याचे अनेक दावे करण्यात आले आहेत. त्यातच आता थेट पहिल्यांदाच जगासमोर आला एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ समोर आला. शास्त्रज्ञांनी प्रथमच दोन कथित एलियनचे मृतदेह सादर केले होते. @IndianTechGuide नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा 26 संकेंदाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओवर 12 सप्टेंबर 2023 अशी तारीख देखील होती. पेरू देशातील कुस्को येथे सापडलेल्या एलियनचे हे मृतदेह असल्याची कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये दोन पेट्यांमध्ये एलियनचे मृतदेह ठेवण्यात आल्याचे व्हिडिओत दिसत होते.
एलियनचे हे मृतदेह हजारो वर्षे जुने असल्याचा दावा करण्यात आला होता. पेरू देशातील कुस्को येथे हे मृतदेह सापडले आहेत. यूएफओच्या ढिगाऱ्यातून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, हे अवशेष आणि पृथ्वीवरील मानव यांच्यात साधर्म्य असले तरी मृतदेह पृथ्वीवरील मानवाचे नसून परग्रहावरील जीवाचे असल्याचा दावा संशोधकांनी केला होता. रेडिओकार्बन डेटिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या दोन्ही मृतदेहांचं विश्लेषण करण्यात आलं.. सामान्य मनुष्यापेक्षा या दोघांची संरचना वेगळी असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला होता.