Argentina president kiss video : अर्जेंटिनाचे नवे राष्ट्रपती जेवियर मायली (javier milei) वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शुक्रवारी जेवियर मायली त्यांची मैत्रीण फातिमा फ्लोरेजच्या मैफिलीत सामील झाले होते. त्यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या वेळी धक्कादायक प्रकार पहायला मिळाला आहे. राष्ट्रपती (Argentina president) रात्री साडेनऊ वाजता मार डेल प्लाटा येथील रॉक्सी थिएटरमध्ये पोहोचले. त्यांनी स्वत:च्या पैशातून शोचे तिकीट घेतले. त्यानंतर त्यांनी स्टेजवर जाऊन भाषण केलं. लोकांनी त्यांच्या भाषणाला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, त्यानंतर जे काही झालं, हे पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती जेवियर मायली यांचं भाषण झाल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्याचवेळी राष्ट्रपतींची मैत्रिण फातिमा फ्लोरेज यांनी मंचावर आली अन् जेवियर मायली यांनी मैत्रिणीचं चुंबन (Argentina president kiss girlfriend) घेतलं. राष्ट्रपतींचा हा प्रकार पाहून उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले. या सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ (Viral Video) समोर आल्यानंतर राष्ट्रपती जेवियर मायली यांच्यावर टीका होत असल्याचं पहायला मिळतंय.


पाहा Video



अर्जेंटिनाचे राष्ट्रपती जेवियर मायले यांनी आपल्या मैत्रिणीसोबत स्टेजवर जे काही केलं ते व्यभिचारी अशा प्रकारे सार्वजनिक मंचावर जाऊ शकतो का? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे. र्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मायले यांनी त्यांच्या लाइव्ह थिएटर शोदरम्यान त्यांच्या मैत्रिणी फातिमा फ्लोरेजला उत्कटतेने किस केले. हा पुरावा आहे की तुम्ही सरकारी कचरा काढून टाकू शकता, असं म्हणत विरोधकांनी राष्ट्रपतींना धारेवर धरलंय. साम्यवाद नष्ट करू शकता आणि तरीही मजा करायला वेळ आहे, असं म्हणत काहीजणांनी नाराजी व्यक्त केलीये.


दरम्यान, राष्ट्रपती जेवियर मायले यांनी पहिल्यांदाच असा प्रकार केलेला नाही. याआधी देखील निवडणुकीच्या मतदानावेळी त्यांनी सर्वांसमोर मैत्रिणीचं चुंबन घेतलं होतं. फातिमा फ्लोरेज आणि जेवियर मायले यांची पहिली भेट एका टॉक शो दरम्यान झाली होती. त्यावेळी त्यांनी डेटिंग करत असल्याचं जाहीर केलं होतं.