नायपिदाँ : गेल्या अनेक दिवसांपासून रोहिंग्या मुस्लिमांवर म्यानमारमध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्द्यावर मौन बाळगलेल्या आंग सांग स्यू की यांनी आज अखेर त्यांचं मौन सोडलं आहे. देशाबाहेर गेलेल्यांपैकी ज्यांना परत मायदेशी यायंचं आहे अशा सर्व रोहिंग्या मुस्लीमांना परत घेण्यास तयार असल्याचं आंग सांग स्यू की यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्यानमारमध्ये बुद्धिस्ट लष्कराकडून होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून लाखो रोहिंग्या मुस्लीम गेल्या काही महिन्यात बांग्लदेश आणि भारतात शरण आले आहेत. यापैकी सुमारे ४० हजार शरणार्थींना माघारी धाडण्याविषयी भारतानं कठोर भूमिका घेतली आहे.  सुप्रीम कोर्टात जारी केलेल्या १६ पानी प्रतिज्ञापत्रात काही रोहिंग्यांचे आयएससीसी आणि पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा भारतीय गृहखात्यानं केला आहे,


शिवाय अवैध शरणार्थींना भारतात ठेवणं शक्य नसल्याचंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. बांग्लादेशमध्ये याहून भीषण परिस्थिती आहे. गेल्या चार महिन्यात बांग्लादेशच्या दक्षिणेला पूराचं संकट आहे. त्यात म्यानमारमधून आलेल्या चार लाख शरणार्थींमुळे देशाच्या एकूण साधनसामुग्रीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शरणार्थींना परत पाठवण्याशिवाय गत्यंतर नसल्याचं बांग्लादेशचं म्हणणं आहे. आज अखेर स्यू की यांनीही पत्रकार परिषद घेऊन रोहिंग्यांन परत घेण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.