कॅनबेरा : छायाचित्रात दिसणारी खाट (बाजलं) तुम्ही पाहिली असेल. आपल्यापैकी अनेकांच्या घरी ती असोल सुद्धा. पण, यात काय विशेष? असे म्हणून तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर, तुम्ही चुकत आहात. कारण, ऑस्ट्रेलियात ही खाट प्रचंड लोकप्रिय झाली आहे. केवळ लोकप्रियच नव्हे तर, प्रचंड पैसा कमावण्याचे साधनही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियातील सोशल मीडियावर तर या खाटेचा भलताच बोलबाला आहे. या खाटेशी संबंधीत एका जाहीरातीने सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रियता मिळवली आहे. या जाहीरातीचे वैशिष्ट्य असे की, या खाटेची किंमत सोशल मीडियावर चक्क ९९० डॉलर इतकी दाखविण्यात आली आहे. भारतीय रूपयात ही किंमत चक्क ५० हजार इतकी होत आहे. ही खाट आरामासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचेही म्हटले आहे.


दरम्यान, ज्या कारागिराने ही खाट सुरूवातीला बनवली असेल तेव्हा त्यालाही कल्पना नसेल की, याला किती पैसे येतील. भारतातील अनेक राज्यांमध्ये ही खाट वापरली जाते. मात्र, त्याकडे विशेष रुपाने कोणीच पाहात नाही. खाटेचा प्रसार करण्यासाठी दिलेल्या जाहीरातीत खाटेची मजबूती, जॉइन्ट्स, नैसर्गिकता आदी गुणांवर भर देण्यात आला आहे.



ही खाट बनविण्यासाठी मनिला रस्सीचा वापर करण्यात आला असून, ही खाट बनवताना कोणत्याही मशिनचा वापर न करता नैसर्गिकरित्या बनविण्यात आली असल्याचा दावाही जाहिरातीत करण्यात आला आहे. ट्विटरवरही ही खाट भलतीच ट्रोल झाली असून, यूजर्स त्यावर आपापली प्रतिक्रीया देत आहेत.