मुंबई :  दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे (Traffic) ऑफिसमध्ये लेटमार्क (Late Mark) लागतो. मात्र आता तुम्ही वेळेत ऑफिसला (Office) पोहचू शकणार आहात, ट्राफिकचं टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही. कारण आता रस्त्यावर बुलेट कार (Bullet Car) धावणार आहेत. बुलेट ट्रेनच्या धर्तीवर बुलेट कार्स येणार आहेत. पाहुयात एक रिपोर्ट. (automobile news china make flying car with high technology see full video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत दरवर्षी एका व्यक्तीचे तब्बल 209 तास ट्रॅफिक जॅममुळे वाया जातात. तर दिल्लीत तब्बल 109 तास वाया जातात. पण आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण आता रस्त्यावर बुलेट कार्स धावणार आहेत. तुम्ही बुलेट ट्रेन धावताना पाहिली असेल त्याच वेगानं तुम्ही ऑफिसला जाऊ शकणार आहात. होय हे अगदी खरं आहे. आता हा व्हिडीओ पाहा.. 



ही आहे खरीखुरी रस्त्यावरुन उडणारी बुलेट कार. ही कार रस्त्यावरुन धावणार नाही तर रस्त्याच्यावर 35 मिलीमीटर उंचीनं उडणार आहे. विशेष म्हणजे ही कार जास्तीत जास्त मायलेज देणार आहे. चीनमध्ये मॅग्लेव टेक्नोलॉजीच्या अंतर्गत या कारचं टेस्टिंग होतंय. काय आहेत या कारची वैशिष्ठ्य पाहुयात..


ही कार 230 किलोमीटर प्रतितास वेगानं रस्त्यावरुन उडेल. रस्त्याच्यावर 35 मिलीमीटर उंचीवरुन ही कार उडेल. मॅग्नेटीक लेव्हिटेशन तंत्रज्ञानाचा उपयोग या कारसाठी करण्यात आलाय.  बुलेट कार ही फक्त इलेक्ट्रिक व्हर्जनमध्येच असेल. पेट्रोल-डिझेलचा या बुलेट कारशी संबंध नसेल. या कारला सुपरबॅटरी बॅकअप असेल. 


मॅग्लेव्ह टॅक्नोलॉजीच्या जोरावर 1980 पासून जपान,चीन आणि दक्षिण कोरियात बुलेट ट्रेन धावतात. चीनची बुलेट ट्रेन तर 600 किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं धावते. आता हीच टेक्नोलॉजी बुलेट कारमध्ये वापरण्यात आलीय. आतापर्यंत तुम्ही अशा कार्स सिनेमात किंवा कार्टूनमध्ये पाहिल्या असतील पण आता या कार्सचं स्वप्नं सत्यात उतरलंय. अर्थात भारतात या कार येणार असतील तर रस्त्यांची अवस्था, ट्राफिक आणि अशा कार्सची किंमत ही आव्हान ठरणार आहेत.